सायनमध्ये गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

 Pratiksha Nagar
सायनमध्ये गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
सायनमध्ये गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
सायनमध्ये गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
See all
Pratiksha Nagar, Mumbai  -  

सायन - येथील भगिनी समाज या संस्थेच्यावतीने 7 ते 9 जानेवारी दरम्यान महिला उद्योजकांनी बनविलेल्या विविध नाविन्यपूर्ण वस्तूचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. सायन भगिनी समाज प्लॉट नं. 6-अ येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दरवर्षी या संस्थेच्यावतीने जानेवारी महिन्यात महिलांसाठी हा उपक्रम राबवला जातो. यंदा या संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाल्याने महिलांना प्राधान्य देणारा उपक्रम आम्ही राबवल्याचे संस्थेच्या अध्यक्ष संगीत उत्पात यांनी सांगितले. महिलांनी लावलेले आकर्षक साडी स्टॉल, खाद्य पदार्थ, दागिने आणि इतर घरगुती वस्तू असे एकूण 65 स्टॉल या प्रदर्शनात मांडले आहेत. नागरिकांचाही त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षांनी दिली.

Loading Comments