• छत्री, रेनकोट, बॅगांनी सजली बाजारपेठ
  • छत्री, रेनकोट, बॅगांनी सजली बाजारपेठ
SHARE

पावसाळा आला की दरवर्षी छत्री, रेनकोट, चप्पल आदी वस्तूंची बाजारात रेलचेल दिसते. या वर्षी लहान मुलांमध्ये फेमस असणाऱ्या कार्टून्सचं डिझाइन छत्र्या आणि रेनकोटवरही दिसू लागली आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध आकारांच्या व रंगांच्या छत्र्या, रेनकोट बाजारात आले आहेत. यात छत्री १५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत तर रेनकोट २०० पासून ९०० रुपयांपर्यंत मिळत अाहे. यात देशी आणि चायना मेड छत्र्यांसह रेनकोटचाही समावेश आहे.


डोरेमॉन, स्पायडरमॅनच्या छत्र्या

लहान मुलांकडून डोरेमॉन, स्पायडरमॅन तर मुलींकडून बार्बी डॉल अशा प्रकारच्या कार्टुन्सच्या डिझाइन असणाऱ्या छत्र्यांना पसंती दिली जात आहे. मोठ्यांसाठीही टू-फोल्ड, थ्री-फोल्ड पद्धतीच्या छत्र्या बाजारात विकायला आल्या आहेत. यातील काही छत्र्यांना झालर लावून सजविण्यात आलं आहे. तर काहींवर फुलांचं नक्षीदार डिझाइन प्रिंट केलं अाहे. काही छत्र्या प्लेन असल्या तरी विविध रंगांत उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या छत्र्यांची किंमत १५० ते ३५० रुपये इतकी आहे. तर तरुणाईसाठी २०० ते ५०० रुपये किमतीच्या छत्र्या उपलब्ध आहेत.


विविध रंग, डिझाइनमध्ये रेनकोट

रेनकोटमध्येही विविध रंग आणि डिझाइन असल्यामुळे लहान मुलांमध्ये ते घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर तरुणांसाठीही नवीन प्रकारचे रेनकोट आणि विनसीटरही अाले अाहेत. लहान मुलांच्या रेनकोटची किंमत २०० ते ३५० रुपये इतकी आहे. तर तरुणांच्या रेनकोट आणि विनसीटरची किंमत ४०० ते ९०० रुपये अाहे.


कार्टुन्सच्या बॅगना पसंती

शाळेसाठी बॅग घेण्यास अालेल्या लहान मुलांनी पालकांसोबत बाजारात गर्दी केल्याचं पहायला मिळतंय. वेगवेगळ्या कार्टुन्सच्या बॅग बघितल्यामुळे हीच बॅग पाहिजे असा लहान मुलांचा हट्ट पहायला मिळतो. कार्टुन्सच्या बॅग्स २५० ते ६०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.हेही वाचा-  

जागतिक तंबाखू विरोधी दिन: व्यसनमुक्त ट्रान्सजेंडर्सचा मुंबईत सन्मान

गरीबांची भूक भागवणारा अनोखा 'फ्रिज'संबंधित विषय
ताज्या बातम्या