Advertisement

40 दृष्टीहीन मॉडेल्सचा रॅम्पवॉक


SHARES

जुहू - टेचात होणारा रॅम्पवॉक, झगमगते प्रकाशझोत, सेलिब्रेटी आणि टाळ्यांचा कडकडाट... हे चित्र होतं जुहूतल्या इसकॉन येथे आयोजित ऑडिटोरियममधलं. नजाकतीनं, टेचात चालणाऱ्या देखण्या मुली तुम्हाला इथं दिसतील... पण... पण या मुली दृष्टीहिन आहेत. तरीही त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, तोच त्यांना खास बनवतोय. नॅशनल असोशिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेनं आयोजित केलेल्या रॅम्पवॉकमध्ये 40 दृष्टीहीन मुलींनी सहभाग घेतला होता. 18 ते 30 वयोगटातल्या मुली या रॅम्पवॉकमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे, गोवा, चंडिगड आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून आल्या होत्या. अभिनेता-दिग्दर्शक सतिश कौशिक यांच्यासह अनेक सेलिब्रिटिजनी रॅम्पवॉकला हजेरी लावली.

संबंधित विषय
Advertisement