सुपरबाइक

BDD Chawl
सुपरबाइक
सुपरबाइक
सुपरबाइक
See all
मुंबई  -  

वरळी - डीएसके मोटोव्हिल्स या कंपनीनं प्रख्यात इटालियन सुपरबाइक ब्रँड बेनेलीच्या दुसऱ्या पर्वाचं अनावरण करण्यात आलंय. गुरूवारी वरळीतल्या डॉ. अॅनीबेझंट मार्गावरील पीएसडी मोटरवर्क्स एलएलपीच्या अत्याधुनिक दालनात डीएसके मोटोव्हिल्सचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते अनावरण झालं.

डीएसके बेनेलीच्या मुंबईतील डिलरशीप अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक दालनामध्ये ‘टोर्नेडो नेकेड ट्रे’ किंवा ‘टीएनटी’ सुपरबाइक्सची संपूर्ण श्रेणी प्रदर्शित करण्यात आली. त्यात टीएनटी २५ - सिंगल सिलेंडर, २५० सीसी इंजिन, टीएनटी ३०० - इन लाइन टू सिलेंडर ३०० सीसी इंजिन, टीएनटी ६०० आय - इन- लाइन फॉर सिलेंडर ६०० सीसी इंजिन, टीएनटी ६०० जीटी- इन लाइन फॉर सिलेंडर ६०० सीसी इंजिन, टीएनटी ८९९- इन- लाइन, तीन सिलेंडर ८९८ सीसी इंजिन आणि टीएनटी आर- इन-लाइन थ्री सिलेंडर ११३१ सीसी इंजिन यांचा समावेश आहे.

उत्पादन आणि किंमत 
टीएनटी - २५ किंमत - १ लाख ८७ हजार रुपये
टीएनटी - ३०० किंमत - ३ लाख १४ हजार रुपये
टीएनटी - ६००(आय-एबीएस) किंमत - ५ लाख ९५ हजार रुपये
टीएनटी - ६०० (जीटी)किंमत - ६ लाख २३ हजार रुपये
टीएनटी - ८९९ किंमत - ९ लाख ८९ हजार रुपये
टीएनटी - (आर) किंमत - १२ लाख ३१ हजार रुपये

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.