‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’

Mumbai  -  

वांद्रे - पौष्टिक अन्न फक्त भूकच भागवत नाही तर, आत्म्यालाही तृप्त करतो. आरोग्यदायी स्वादिष्ट जेवण हे पंचेंद्रियांनाही शांत करतो, अशीच विचारसरणी असलेलं वांद्र्यातील ब्लू रेस्टॉरेंट. या रेस्टॉरंटमध्ये थाय आणि जापनीज खाद्यपदार्थ परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. काओ करी, वसाबी झिंगे आणि सोम्तम ही इथली सर्वात लोकप्रिय डीश आहे. तर इथल्या मेन्यूतील पपई आणि मिर्चीची सॅलडची बातच काही और. इथे मिळणारी टॉम यम आणि टॉम खा सूप पौर्वात्य संस्कृतीची आठवण करून देते. इथल्या अनेक डिशची किंमत 120 ते 150 रुपयांपर्यंत आहे. तर दोन व्यक्तींच्या जेवणासाठी तुम्हाला 1 हजार 500 रुपये मोजावे लागतील.

Loading Comments