जॉबच्या पहिल्या दिवशी या ८ गोष्टी नक्की करा

ओळख करून घेण्यापर्यंत आणि अगदी नेटकं बोलण्यापर्यंतच पहिला दिवस असू द्या. उगाच वायफळ बडबड करत बसलात तर तुमचे कलिग्स पहिल्याच दिवशी दुरावले जातील. सर्वांशी बोला पण मोजकेच बोललेलं चांगलं.

SHARE

जॉबच्या पहिल्या दिवशी सर्वजण थोडे टेंशनमध्येच असतात. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हे आपल्या सर्वांच्याच डोक्यात असतं. त्यामुळे ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी कसं काम करायचं? ऑफिस कलिगसोबत कसं जमवून घ्यायचं? या सर्व गोष्टींचा विचार आपण करत असतो. या टेन्शनमध्ये आपण अनेक चुका करून बसतो. पण या चुकांपासून आम्ही तुम्हाला वाचवू शकतो. आज आम्ही तुम्हाला ८ टिप्स देणार आहोत ज्या तुम्ही नवीन जॉबला जाताना अमलात आणा.

१) ऑफिसच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठा, जेणेकरून तुम्ही ऑफिसला पोहोचेपर्यंत सकाळची मरगळ निघून गेलेली असेल.

२) सकाळची ब्रेकफास्ट करायची सवय नसेल तर ती लावून घ्या. कारण या एका सवयीमुळे तुम्ही रोज सकाळी फ्रेश राहू शकता.

३) ऑफिसच्या पहिल्या दिवशी प्रोफेशनल कपडे घालून जा. जिन्स आणि टी शर्ट बिलकुल घालू नका.

४) पहिल्याच दिवशी उशीरा पोहचू नका. याचा अर्थ पहिल्या दिवशी वेळेत आणि बाकी दिवशी उशीरा पोहचलं तरी चालेल असा होत नाही. ऑफिस वेळेच्या कमीतकमी १०-१५ मिनिटं आधी पोहोचण्याचं प्लॅनिंग करा.

५) सगळ्या ऑफिसेसमध्ये नवीन कोणी जॉईन झालं की ओळख करून द्यायची पद्धत असते. परंतु तशी ओळख झाली नसेल तर, तुम्ही स्वतः जाऊन ओळख करून घ्या. तुमची जर प्रत्येकासोबत वैैयक्तिक ओळख झाली तर सुरूवातीला येणाऱ्या अडचणींसाठी तुम्ही सहज मदत मागू शकता.

६) ओळख करून घेण्यापर्यंत आणि अगदी नेटकं बोलण्यापर्यंतच पहिला दिवस असू द्या. उगाच वायफळ बडबड करत बसलात तर तुमचे कलिग्स पहिल्याच दिवशी दुरावले जातील. सर्वांशी बोला पण मोजकेच बोललेलं चांगलं.

७) तुम्हाला नेमकं काय काम करायचं आहे? हे तुमच्या हेडला विचारा. पहिला दिवस आहे काय काम असणार असा विचार करून बसून राहू नका. पहिल्या दिवसापासून कामात रुची दाखवा. तरच तुमच्या वरिष्ठांच्या लक्षात येईल की तुम्हाला कामाची आवड आहे आणि तुम्ही जबाबदार देखील आहात.

८) पहिल्या दिवशी करायला काम असो नसो, पण घरी जायची घाई करू नका. निघताना तुमच्या हेडची परवानगी घेऊनच निघा. जेणेकरून त्यांना माहित असेल की तुम्ही घरी जात आहात.
संबंधित विषय
ताज्या बातम्या