Advertisement

घरातील आधुनिक बाग!


घरातील आधुनिक बाग!
SHARES

सुंदर हिरवीगार पालवी फुटलेली बाग ही मनाला वेगळाच आनंद देते. घर, कार्यालय किंवा रेस्टॉरंट असो या सर्वांची शोभा वाढते ती बागेमुळे. घरात आणि घराबाहेरील वातावरणाला अनुकूल आणि सुसंगत असी बाग असायला काही हरकत नाही. पण आपल्या इथं जागेची खूप मोठी समस्या आहे. 



सुरुवातीच्या काळात बाग मोकळ्या मैदानावरील जागेत होती. पण जागेच्या समस्या पाहता हल्ली इनडोअर गार्डन अर्थात घरातील बाग ही संकल्पना अधिक झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. टवटवीत झाडे आणि फुले वातावरणात एक सकारात्मकता निर्माण करतात. त्यामुळे मन आणि स्वास्थ्य प्रसन्न राहते. इनडोअर बागकामात ताजी फुलं तसेच अन्य वनस्पतींची होत असलेली वाढ घरात एक सुगंध निर्माण करते. अशीच काही झाडं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी तुम्ही घरच्या बागेत ठेवू शकता.


अॅन्थुरियम

या वनस्पतीच्या फुलांचा हृदयाकृती आकार, लालभडक रंग आणि मध्यावर पिवळसर कोवळा देढ आकर्षक दिसतो. ही फुले जाडावर २० ते २२ दिवस छान टवटवीत राहतात. फुलं झाडावरून काढून फुलदाणीत ठेवली तरी १० ते १२ दिवस चांगली राहतात. 


याची फुलं वर्षभर फुलतात. या झाडांच्या मुळांजवळ हवा खेळती ठेवण्यासाठी ही मातीच्या मिश्रणात न लावता नारळाच्या सोढणाचे तुकडे, विटांचे तुकडे आणि लोणारी कोळशाचे तुकडे समप्रमाणात घेऊन त्यात याचे रोप लावावे.


टँगल हार्टस


बदामी आकाराच्या पानांची वेल असणारी ही वनस्पती भरघोस वाढते. सावलीत या वनस्पतीची वाढ होते. पण सूर्यप्रकाशात ती अधिक टवटवीत होते. हँगिंग बास्केटमध्ये जर ही वनस्पती लावली तर अधिक शोभून दिसेल.


ड्रेसेना प्लांट



लांब निमुळती पाने, त्यावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या रेषा आणि छान उंच वाढणारी ड्रेसेन प्लांट. पाण्याच्या प्रमाणाचे योग्य संतुलन साधून, या वनस्पतीच्या कुंडीतील माती साधारण ओलसर राहिल याची काळजी घ्यावी.


अॅल्युमिनियम प्लांट

हिरव्यागर्द आखूड पानांवर पिवळट पांढऱ्या पट्यांनी सजलेली ही वनस्पती छान उंच वाढते. मात्र, या वनस्पतीला जास्त वाढू देऊ नये. सतत छाटत रहावे.


बिलबर्जीया

हे झाड अननसाच्या कुळातील आहे. यास एकदा फुल आले की मग ते झाड मरते. पण मरण्याआधी त्यास ४-५ पिले फुटतात आणि कालांतरानं त्यांनाही फुले येतात. 


स्प्रेच्या मदतीनं या झाडांना पाणी द्यावं. पानाच्या खोडावरील भागात काही विशिष्ट प्रकारच्या पेशी हे पाणी शोषून घेतात आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो.



हेही वाचा

आता घरातली पेंटिंग्जही मिळणार भाड्याने!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा