Advertisement

आता घरातली पेंटिंग्जही मिळणार भाड्याने!

पेंटिंग्ज आणि आर्टवर्कची किंमत लाखोंच्या घरात असते. त्यामुळे सर्वांनाच हे पेंटिंग्ज किंवा आर्टवर्क विकत घेता येत नाही. पण जर तुम्हाला ही पेंटिंग्ज आणि आर्टवर्क रेंटवर मिळाली तर? रेंटवर? कसं शक्य आहे? असाच प्रश्न तुम्हाला पडला आहे ना? पण मुंबईत राहणाऱ्या शक्ती स्वरूप शाहू, राहुल यादव आणि अगम मेहता यांच्यामुळे हे शक्य झालं आहे!

आता घरातली पेंटिंग्जही मिळणार भाड्याने!
SHARES

घराच्या सजावटीसाठी एखाद्या नावाजलेल्या चित्रकाराचे पेंटिंग किंवा एखादं मस्त आर्टवर्क आपल्या भिंतीवरही टांगलेलं असावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण या पेंटिंग्ज आणि आर्टवर्कची किंमत लाखोंच्या घरात असते. त्यामुळे सर्वांनाच हे पेंटिंग्ज किंवा आर्टवर्क विकत घेता येत नाही. पण जर तुम्हाला ही पेंटिंग्ज आणि आर्टवर्क रेंटवर मिळाली तर? रेंटवर? कसं शक्य आहे? असाच प्रश्न तुम्हाला पडला आहे ना? पण मुंबईत राहणाऱ्या शक्ती स्वरूप शाहू, राहुल यादव आणि अगम मेहता यांच्यामुळे हे शक्य झालं आहे!



फ्लोटिंग कॅनव्हास कंपनी

शक्ती स्वरूप शाहू, राहुल यादव आणि अगम मेहता या तिघांनी तीन महिन्यांपूर्वी 'फ्लोटिंग कॅनव्हास कंपनी' सुरू केली. या कंपनी अंतर्गत हे तिघे नावाजलेल्या चित्रकारांचे पेंटिंग्ज आणि आर्टवर्क रेंटवर देतात. फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीनं क्रिएटिव्ह कलाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. यामध्ये अनेक नामवंत फोटोग्राफर्स आणि पेंटर्सचा समावेश आहे. फ्लोटिंग कॅनव्हास कंपनीतर्फे त्यांचे पेंटिंग्ज किंवा आर्टवर्क रेंटवर ठेवतात. कुणाला पसंत आली, तर ते त्यांच्याकडून रेंटवर घेतात. ज्या पेंटरचे आर्टवर्क विकले गेले, त्याला त्याचा हिस्सा दिला जातो.



किती पैसे मोजावे लागतील?

व्यावसायिक हेतू म्हणून देखील तुम्ही आर्टवर्कचा वापर करू शकता. कामाच्या जागी तुम्हाला हव्या त्या थीमवर आधारित पेंटिंग्स आणि आर्टवर्क मिळू शकते. याशिवाय तुम्हाला तुमचं घरं सजवायचं असेल, तरी तुम्ही इथून रेंटवर पेंटिंग्ज घेऊ शकता. दर सहा महिन्यांनी तुम्ही हे पेंटिंग्ज बदलून त्याएवजी दुसऱ्या थीमवर आधारित आर्टवर्क घेऊ शकता



यामुळे तुमच्या घराचा लुक क्लासी आणि हटके वाटेल. एक महिन्यासाठी तुमच्याकडून ९० रुपयांपासून ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पैसे आकारले जातील. प्रत्येक आर्टवर्कवरून किती पैसे आकारायचे हे ठरवण्यात येतंसध्या त्यांची ही सेवा मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, कोची आणि गोवा इथं सुरू आहे. येत्या काळात ते आपल्या कामाचा अधिक विस्तार करणार आहेत.



तुम्हाला देखील घरात पेंटिंग्ज आणि आर्टवर्क लावायचे असतील, तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटच्या मदतीनं तुम्हाला हवे ते पेंटिग तुम्ही घेऊ शकता.



हेही वाचा

अरे व्वा! आता कपडेही मिळणार हप्त्यांवर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा