अरे व्वा! आता कपडेही मिळणार हप्त्यांवर!


  • अरे व्वा! आता कपडेही मिळणार हप्त्यांवर!
SHARE

आत्तापर्यंत ईएमआयवर आपण घर, कार किंवा जास्तीत जास्त टीव्ही, फ्रीज अशा वस्तू खरेदी करत होतो. पण आता यापुढे कपडेसुद्धा इएमआयवर म्हणजेच इन्स्टॉलमेंटवर मिळणार आहेत. लगा ना जोर का झटका? आणि किती रुपयांच्या हफ्त्यांवर तुम्हाला कपडे विकत घेता येणार आहेत हे ऐकून तर तुम्ही नक्कीच तोंडात बोटं घालाल.


ऑफर कुणाची?

हल्ली ऑनलाईन शॉपिंगची भलतीच क्रेझ आहे. जो तो उठसूट ऑनलाईन शॉपिंग करत असतो. त्यात वेळेचीही बचत होते आणि एक से एक ऑफर असतातच. पण इन्स्टॉलमेंटवर कपडे घेता येणार ही ऑफर पहिल्यांदाच ऑनलाईन शॉपिंग या क्षेत्रात आली आहे. फॅशन जगतातील आघाडीची ई कॉमर्स वेबसाईट myntra.com ने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारचा पर्याय देणारी myntra.com ही भारतातील पहिलीच साईट ठरली आहे.दरमहा किती हप्ता भरावा लागणार?

दर महिन्याला अवघ्या ५१ रुपयांच्या हप्त्यावर तुम्ही कपडे खरेदी करू शकता. पण अट एवढीच की १ हजार ३०० रुपयांच्या पुढील किमतीच्या कपड्यांच्या खरेदीवर ही सुविधा मिळणार आहे. फ्लिपकार्टची मालकी असलेल्या myntra.comनं यासाठी आयसीआयसीआय, एचडीएफसी, सिटी बँक, एचएसबीसी यांसारख्या आघाडीच्या बँकांशी करार केला आहे. पण जर तुम्ही क्रेडिट कार्डवरून खरेदी करणार असाल, तर तुम्हाला १३ ते १५ टक्के व्याज भरावं लागू शकतं. काही मोजक्या वस्तूंचे पैसे तुम्ही ३ ते २४ महिन्यांच्या हफ्त्यांवर भरू शकता.

अर्थात ही बातमी ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची आहे यात काही शंका नाही! सर्वच तरुणांना हजार, दोन हजार असे महागडे कपडे घेणं पडवडत नाही. कारण पॉकेटमनी कमी असतो. त्यात सर्वच पैसे कपड्यांवर खर्च करून कसं चालेल? त्यामुळे युथसाठी तर ही चांगलीच पर्वणी आहे! आत्तापर्यंत अनेकांची इएमआयवर शॉपिंग करून देखील झाली असेल. अजून शॉपिंग केली नसेल तर काही काळजी करू नका. काही दिवस तरी या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. हेही वाचा

मुंबईत फिरताहेत रंगीबेरंगी हत्ती!


संबंधित विषय