SHARE

मैत्रीचं नातं सेलिब्रेट करण्यासाठी कोण्या एका खास दिवसाची गरज नसते. कारण मित्रांसाठी प्रत्येक दिवस हा खासच असतो, पण तरीही संपूर्ण जगभरात आॅगस्टच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’चा जल्लोष पाहायलाय मिळतं. मुंबईतील तरुणाईही शुक्रवारपासूनच फ्रेंडशिप डे साठी उत्साही होते. 

त्यातच रविवारी ५ ऑगस्टला शाळा, कॉलेजना सुटी असल्यानं सर्व मित्र आणि मैत्रिणी एका ठिकाणी भेटून एकमेकांच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधून किंवा मार्कर पेनने स्वत:चं नाव लिहून मैत्रीचं नातं खुलवण्याचा प्रयत्न करताना दिसले. 


दुकानांत गर्दी

मुंबईतील अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आहे. मैत्रीचे बंध गुंफताना आवश्यक भेटवस्तू, ग्रीटिंग खरेदीसाठी तरुणाईची झुंबड उडताना दिसत आहे. यामध्ये  फ्रेंडशिप बँडसह विविध वस्तू खरेदीला तरुणाई पसंती देत आहे.

फ्रेंडशिप डेची खरी सुरुवात

‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्याचा ट्रेंड हा पाश्चिमात्य देशाकडून आला आहे. फ्रेंडशिप डेची खरी सुरुवात पहिल्या महायुद्धानंतर झाली. पहिल्या महायुद्धानंतर आपापसांतील द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाची भावना संपवण्यासाठी १९३५ मध्ये अमेरिकन सरकारने ‘फ्रेंडशिप डे’ला सुरुवात केली. त्यांनतर हा ट्रेड सर्व जगभर रूढ होण्यास सुरुवात झाली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या