बालजल्लोषात बच्चे कंपनीची 'मनसे' धमाल

गिरगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेतर्फे बच्चे कंपनीसाठी नवीन वर्षानिमित्त फन अँड फेअर जल्लोष 2016 नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनिरुद्ध प्रतिष्ठानचंही या उपक्रमाला साह्य आहे. गिरगावात 31 डिसेंबरच्या रात्री हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बच्चे कंपनीनं फुल टू धम्माल केली. चिमुकल्यांना आवडणारी खेळणी आणि खाऊनं मुलांचा सुट्टीचा आनंद वाढवला. या उपक्रमाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केलं. आपल्या मुलांच्या आयुष्यात मनसेनं फुलवलेले हे आनंदाचे क्षण पालकांनीही दिलसे एन्जॉय केले...

Loading Comments