घाटल्यात उद्यान, ओपन जीमचं लोकार्पण

 Mumbai A 73
घाटल्यात उद्यान, ओपन जीमचं लोकार्पण
घाटल्यात उद्यान, ओपन जीमचं लोकार्पण
See all

घाटलागाव - चेंबूरच्या प्रभाग क्रमांक 153 मधील घाटला-खारदेवनगर भागात एकही उद्यान नसल्याने पालिकेकडून घाटल्यातील बोर्ला गावात अद्ययावत उद्यान आणि घाटला गावात अोपन जीम बांधण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी खासदार राहुल शेवाळे यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, महिला विभाग संघटक रिटा वाघ, एम पश्चिमचे सहाय्य्क मनपा आयुक्त हर्षद काळे, निरंकारी मंडळाचे मोहनजी गुंडोजी हेही उपस्थित होते. या उद्यानात जॉगिंग ट्रेक, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्यानाला बाबा हरदेव सिंहजी महाराज (निरंकारी बाबा) यांचे नाव देण्यात आले आहे.

Loading Comments