Advertisement

सायकल चालवण्याचे हे फायदे वाचाल तर बाईक विसराल

कदाचित तुम्हाला माहित नसेल सायकल चालवण्याचे किती फायदे असतात. सायकल चालवल्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, आजार कमी होण्यास मदत होते. बायसिकल डे निमित्त जाणून घेऊयात नेमके काय फायदे आहेत?

सायकल चालवण्याचे हे फायदे वाचाल तर बाईक विसराल
SHARES

लहान असतानाच सायकल चालवली जायची. पण मोठे होताच आपण सायकल चालवणं सोडून देतो. आता बाईक किंवा कार यांचा वापर अधिक होताना दिसतो. सायकल काय लहान मुलांची सवारी असं तिच्याकडे पाहिलं जातं. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल सायकल चालवण्याचे किती फायदे असतात. सायकल चालवल्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, आजार कमी होण्यास मदत होते. आज आम्ही सायकल चालवण्याचे फायदे तुम्हाला सांगणार तर आहोतच. शिवाय सायकल चालवताना काय काळजी घेणं आवश्यक आहे हे देखील सांगणार आहोत.

) सायकलिंग हा एरोबिक प्रकार आहे. त्यामुळे शरीरावर जास्त ताणही पडत नाही आणि दुखापत कमी होते.

) वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून 3 दिवस सायकलिंग जरूर करावे. एका तासात ५०० ते ८०० कॅलरीज सायकलिंगमुळे खर्च होतात.


) नियमित सायकल चालवल्यानं हृदय फुफ्फुसे आणि रक्‍त प्रवाह सुधारतो. यामुळे हृदय विकाराचं प्रमाण कमी होतं. हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

) मधुमेह प्रकार २ चे प्रमाण लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. कमी कष्टाची कामे किंवा व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह होण्याची शक्‍यता असते. जे लोक दररोज ३० मिनीटं सायकल चालवतात त्यांना मधुमेह प्रकार-२ होण्याची शक्‍यता ४० टक्क्यांनी कमी होतो.

) सायकल चालवण्याने ताकद, समतोल आणि समन्वय हे शारिरीक गुण वाढतात. यामुळे खाली पडणे, हाडे मोडणे याची शक्‍यता कमी होते. सायकल चालवताना सांध्यावर ताण कमी पडतो त्यामुळे दुखापत कमी होते.

) मन उदास होणे, ताण तणाव, चिडचिडेपणा येणं हे सर्व सायकलिंगनं कमी होतं.


काय काळजी घ्यावी?

) सायकलिंगनं व्यायाम आणि मनोरंजन दोन्ही होतं. पण काळजी आवश्यक आहे. सायकल रस्त्यावर चालवत असाल तर हेल्मेट, नी पॅड, एल्बो पॅड वापरावे.

) पाठीचा त्रास असणाऱ्यांनी जिम किंवा घरामध्ये 'रेमकेंडेड बाईक’ चा वापर करावा. ज्यामुळे पाठीला आधार मिळतो.

3) सायकल निवडताना- सायलकमध्ये बरेच प्रकार आहे. व्यायामासाठी, खेळासाठी, प्रवासासाठी अथवा इतर काही गोष्टीसाठी यावरून सायकलची निवड करावी. सायकल कधीही ऑनलाईन विकत घेऊ नये. कारण तुमची गरज, उंची शरीराची ठेवण यावरून सायकलची निवड होते. दुकानदाराशी चर्चा करूनच सायकल खरेदी करावी.

) जर बाहेर सायकल चालवणं शक्‍य नसेल तर घरातील सायकल घ्यावी किंवा जिममध्ये जाऊन स्पिंग बाईक, रेमकेंडड बाईक, स्टेशनरी बाईकचा वापर करावा. दोन्हीचे फायदे सारखेच आहेत. यामध्ये अजून एक प्रकार येतो. 'विंड ट्रेनर’ ज्यामध्ये तुम्ही सायकलला घरात स्टॅण्ड लावून काही काळ पुरता घरात एका जागी वापरू शकतो.

) कडक आणि छोटी सीट असणाऱ्या सायकलचा वापर टाळा. सिटची उंची अशी ठेवा ज्यामुळे गुडघा पूर्ण वाकणारही नाही किंवा पूर्ण पाय सरळही होणार नाही. पायात २५ अंशाचा कोन असूदेत. ज्यामुळे गुडघ्यावर ताण न पडता लॉकही होणार नाही.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा