अंतर्वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन

Andheri, Mumbai  -  

वांद्रे - गेल्याकाही वर्षांपासून फॅशनच्या दुनियेत भारत अग्रेसर राहिला आहे. मात्र आजही भारतात अंतर्वस्त्राला तितकसं महत्त्व दिलं जात नाही. यावर बोलणं देखील अनेकजण टाळताना आपण पाहतो. मात्र जगभरात फॅशन उद्योगात अंतर्वस्त्राला खास स्थान आहे. त्यामुळेच की काय भारतातील अंतर्वस्त्रांच्या उद्योगाला चालना मिळावी आणि नवनव्या डिझायनर्सना प्रोत्साहन मिळावं यासाठी 17 आणि 18 मार्चला पहिल्या फॅशन वीकचं आयोजन करण्यात आलं आहे. या फॅशन वीकमध्ये 35 डिझायनर सहभाग घेणार असून, त्यांनी डिझाईन केलेल्या कलेचं प्रदर्शन केलं जाईल. अंधेरी पश्चिम इथल्या द ललित हॉटेलमध्ये हा फॅशन वीक होणार आहे.

Loading Comments