मुलुंड - महाराष्ट्र सेवा संघ सभागृहात रविवारी सकाळी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. आर्थिक गुंतवणूक कशाप्रकारे आणि कुठे करावी अशा अनेक आर्थिक प्रश्नांची उत्तरे सामान्यांना मिळावी, यासाठी अर्थ तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र सेवा संघच्या अर्थ विभागानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अर्थ अभ्यासक आणि अर्थतज्ञ डॉ.अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना अनेक आर्थिक शंकांचे निरसन झाले. फक्त व्याज दरावर जगू नका तर मुद्दल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करा. ज्येष्ठ नागरिकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये हा समज चुकीचा आहे. शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार किंवा जुगार नाही, तर ती एक गुंतवणूक आहे आणि त्यात काहीही अयोग्य नाही. तसेच गुंतवणूक करताना योजनेच्या जोखीमीची संपूर्ण माहिती घ्या. अधिकाधिक गुंतवणूक लिक्विड फंड मध्ये करा असे सल्ले या वेळी ग्राहकांना देण्यात आले.