बहुप्रतिक्षित जॅगवार भारतात लाँच

  मुंबई  -  

  मरिन ड्राइव्ह - शानदार लूक, डोळ्यांना मोहणारा रंग,टॉप स्पीड आणि पॉवरफुल इंजिन. ही वैशिष्ट आहेत भारतात लाँच झालेल्या जॅगवार एफ-पेस या कारची. ब्रिटिश कार निर्माता कंपनीनं जगुआर लँड रोवरनं ही कार गुरुवारी मरिन ड्राइव्ह इथं लाँच केलीय. फॉर्मूला वन रेसर नारायण कार्तिकेयन आणि फेमस सिंगर शंकर महादेवन यांनी ही कार लाँच केली. जॅगवार F-PACE 2.0 ची किंमत 68.40 लाख रुपये तर जॅगवार F-PACE 3.0 ची किंमत 1.12 करोड़ रुपये आहे. 1 नोव्हेंबरपासून कारची विक्री सुरू होईल.

  जॅगवार एफ-पेसची वैशिष्टे

  तीन वॅरियन्ट्समध्ये कार जॅगवार एफ-पेस उपलब्ध
  लाल, सफेद आणि मरून कलरमध्ये कार उपलब्ध
  कारचा टॉप स्पीड 200 किलोमीटर प्रती ताशी
  5 सेकंदात ही कार 100 किलोमीटरपर्यंत धावणार
  कारमध्ये 1990सीसी इंजिन
  कारची बॉडी अल्युमिनियमपासून तयार केलीय
  कारमध्ये 25.91 सेमीचं टॅबलेट स्टाइल टच स्क्रिन
  डॉल्बी साऊंड सिस्टम

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.