काय पो छे

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मकरसंक्रांतीला तिळगुळाइतकंच महत्त्व पतंग उडवण्यालाही आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही पतंग उडवण्याचा मोह आवरत नाही. संक्रांत जवळ आल्यानं आता वांद्र्यातल्या पतंग मार्केटमध्ये विविध आकारांचं, रंगांचे पतंग दिसू लागलेत. बच्चे कंपनीला आवडणारी बेन 10, टॉम & जेरी, मोटू, स्पायडरमॅन, छोटा भीम ही कार्टूनही पतंगांवर अवतरली आहेत.

समुद्रकिनारी पतंग उडवायला कुणाला आवडणार नाही? यासाठीच खास तयार केलेले इझी टू फोल्ड, प्लॅस्टिक, टेल काइट्सचे पतंग लक्षवेधी ठरतायत. रॉकेट, जुडाई अशा पतंगांबरोबरच चायना मेड पतंगांनाही पसंती मिळतेय.

पतंग उडवताना आणि पेच घेताना सर्वात महत्त्वाचा असतो तो मांजा...आणि त्याचेही विविध प्रकार इथे उपलब्ध आहेत. मग यंदा मकर संक्रांतीला पतंग उडवणार आहात ना? मग पतंग खरेदी करायला इथे यायला विसरू नका...!

Loading Comments