Advertisement

जाणून घ्या नवीन नोटांसंदर्भातील ९ गोष्टी


जाणून घ्या नवीन नोटांसंदर्भातील ९ गोष्टी
SHARES

नोटाबंदीनंतर ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बाद करण्यात आल्या. या बदल्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या. आता तर २००, ५० आणि १० रुपयाच्या देखील नव्या नोटा बाजारात आल्या आहेत. या नवीन नोटा वेगळ्या तर आहेतच पण त्यात अनेक बदलही करण्यात आले आहेत. रंग तर वेगळा आहेच पण यासोबतच नोटांची साईज देखील बदलण्यात आली आहे. पण या व्यतिरिक्त अाणखी काही विशेष या नोटांमध्ये आहे.


१) नव्या ५०, २००, ५०० आणि २००० च्या नोटांवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो पहायला मिळतो. एक कदम स्वच्छ भारत की और अशी टॅगलाईनसुद्धा नोटांवर आहे.


२) २००० च्या नोटेवर मागच्या बाजूला मंगळयानाची प्रतिमा आहे. हे भारताच्या पहिल्या इंटर प्लॅनेटरी मिशनचं प्रतिनिधित्व करते. तर १००० ची जूनी नोट भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करत होती.

३) ५०० च्या नव्या नोटेवर लाल किल्याचा फोटो आहे. यासोबतच भारताचा झेंडा देखील पहायला मिळतो. तर जुन्या ५०० च्या नोटेवर दांडी यात्रेचं चित्र होतं.


४) नोटांवर महात्मा गांधीजींचा १९४६ चा फोटो वापरला आहे. हा फोटो राष्ट्रपती भवनातला असून फेडरिक विलियम पेथिक लॉरेस यांच्यासोबतचा आहे. जुन्या नोटांवर या फोटोच्या मिरर इमेजचा वापर करण्यात आला आहे. तर नवीन नोटांवर वास्तविक फोटो वापरण्यात आला आहे.

५) नवीन नोटावरील आकडे हे देवनागरी लिपीत लिहिण्यात आले आहेत. जुन्या नोटांवर असे आकडे नव्हते.



६) २०० च्या नव्या नोटेमागे सांची स्तूपाची आकृती बनवण्यात आली आहे. भोपाळजवळ असलेले सांची स्तूप हे भारतातील सर्वात प्राचीन दगड रचनांपैकी एक आहे.

७) ५० रुपयांच्या नव्या नोटेमागे रथासोबत हम्पीचं चित्र आहे. कर्नाटक इथल्या हम्पीला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलं आहे. जुन्या ५० च्या नोटेवर संसदेची आकृती आहे. ५० ची जुनी आणि नवीन नोट दोन्हीही चलनात आहेत.

८) दृष्टीहीन लोकांना देखील नोटा ओळखता याव्यात यासाठी काही नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. नवीन नोटेमध्ये अशोक स्तंभ आणि महात्मा गांधीजींच्या चित्राला उठाव देण्यात आला आहे. ओळख चिन्ह आणि ब्लीड लाइन्सच्या मदतीनं दृष्टीहीन नोट ओळखू शकतात. २००० च्या नोटेवर ७ ब्लीड लाईन्स, ५०० च्या नोटेवर ५ ब्लीड लाईन्स तर २०० च्या नोटेवर ४ ब्लीड लाईन्स आहेत.

९) नव्या नोटांमध्ये अनेक चित्रांचं आणि शब्दांचं स्थान बदलण्यात आलं आहे. अशोक स्तंभाला उजवीकडं हलवण्यात आलं आहे.



हेही वाचा

१०० च्या नवीन नोटेवरील 'राणी की वाव'ची रंजक गोष्ट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा