Advertisement

कोकण महोत्सव : कला, संस्कृती आणि खाद्य परंपरेचा खजिना

कोकण महोत्सवात तारपा, जाखडी, नमन, कोळी लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये २०० कलाकारांचा सहभाग आहे. तसंच दशावतार, पुराणकथांवर आधारित नाटकं, गाणी, नृत्य, संगीत अशी कलासफरही रसिकांना घडेल.

कोकण महोत्सव : कला, संस्कृती आणि खाद्य परंपरेचा खजिना
SHARES

कला, संस्कृती आणि खाद्य परंपरेचा खजिना म्हणजे 'कोकण महोत्सव'... दशावतार, तारपा नृत्य या पारंपरिक लोककला, वारली कला, लोकनृत्य तसंच पुरणपोळी, मोदक, सोलकढी भात असे शाकाहारी-मांसाहारी खाद्यसंस्कृतीतील वैविध्याचा आस्वाद घ्यायला मुंबईकरांना नक्कीच आवडेल. मग तुमच्यासाठीच कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे ६ जानेवारीपर्यंत गोरेगावच्या मुंबई एक्झिबिशन सेंटर व्या ग्लोबल 'कोकण महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे.


कोकण महोत्सवाचं वैशिष्ट्य

कोकण महोत्सवात तारपा, जाखडी, नमन, कोळी लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये २००  कलाकारांचा सहभाग आहे. तसंच दशावतार, पुराणकथांवर आधारित नाटकं, गाणी, नृत्य, संगीत अशी कलासफरही रसिकांना घडेल. विशेष म्हणजे कोकणातला प्रसिद्ध लोकनाट्यप्रकार म्हणजे ‘दशावतार’. हा कलाप्रकारही यावेळी पाहण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील नामवंत कवींचे संमेलन यावेळी होणार आहे. कोकणातील कलाप्रकार, सौंदर्य, व्यवसाय, खाद्यपदार्थ आणि संस्कृती जतन करणे आवश्यक आहे. यासाठी या महोत्सवाच्या निमित्तानं कलाकारांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिऴेल.


खाद्यपदार्थांची मेजवानी

कोकणातील खाद्यपदार्थांबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण कोकणातल्या संस्कृतीसोबतच तिथली खाद्य संस्कृती देखील चांगलीच प्रसिद्ध आहे. या महोत्सवात देखील कोकणातील खाद्य पदार्थ, माशांच्या विविध पाककृती, रुचकर सोलकढी ते पारंपरिक गोड पदार्थांची चव चाखायला मिळेल. विविध प्रकारच्या १५ मिसळ, शाकाहारी, मांसाहारी मिसळींचा आस्वाद घेता येईल.


कोकणातील कलाकुसरी

कुंभारकाम, ब्लॉक पेंटिंग, सिरॅमिक एनॅमलिंग, वारली चित्रकला, गोंड कला, गंजिफा, धातूच्या तारांपासून दागिने, व्यक्तिचित्रं आणि पेंटिंग्जची प्रात्यक्षिकं तुम्हाला पाहता येतील. प्रख्यात कलाकार सुमित पाटील आदिवासींच्या जीवनशैलीवर आधारित ‘वारली कला एक आर्ट इन्स्टॉलेशन’ या नावाचं प्रदर्शन भरवणार आहेत. यात कोकणाच्या प्रगतीचे अनेक पैलू महोत्सवप्रेमींना उलगडतील.

कुठे : कोकण महोत्सव, मुंबई एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव

कधी : ६ जानेवारी २०१९, रविवार

वेळ सकाळी १० ते रात्री १०


हेही वाचा

मुंबईत भरलेल्या 'माणदेशी' महोत्सवाला भेट द्याच


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा