दिवाळीत यंदा साहित्याचा फराळ

 Dadar
दिवाळीत यंदा साहित्याचा फराळ
दिवाळीत यंदा साहित्याचा फराळ
दिवाळीत यंदा साहित्याचा फराळ
See all
Dadar , Mumbai  -  

दादर - मुंबईतल्या प्रसिद्ध बुक डेपोंपैकी एक, शिवाजी मंदिर येथील मॅजेस्टिक बुक डेपो दिवाळीनिमित्त वाचकांसाठी खास भेट घेऊन आलाय. यामध्ये वाचकांना 1 हजार 70 रुपयांचा दिवाळी अंकांचा मॅजेस्टिकचा दर्जेदार संच फक्त 890 रुपयांत मिळेल. यामध्ये मौज, दिपावली, अक्षर, अनुभव, कालनिर्णय सांस्कृतिक, महाराष्ट्र टाइम्स हे दिवाळी अंक असतील. त्याचबरोबर तिरकीटधा (द्वारकानाथ संझगिरी), भुइरिंगण (रश्मी कशेळकर), इन्स्टॉलेशन्स (गणेश मतकरी), ट्रिटमेंट संवादाची (बिपीन मयेकर) या चार पुस्तकांपैकी वाचकाच्या आवडीचं एक पुस्तक नोंदणी करतानाच भेट दिलं जाईल. त्याचबरोबर ‘मॅजेस्टिक कालनियोजक डायरी’ही या संचात असेल. भेट म्हणून मिळणाऱ्या पुस्तकाची किंमत 200 रुपये तर डायरीची किंमत 70 रुपये आहे. हा संच पोस्टाने पाठवण्याचीही सोय मॅजेस्टिकने केली आहे.

Loading Comments