Advertisement

पर्यावरण संवर्धनासाठी कन्याकुमारी ते काश्मीर सायकलस्वारी !


SHARES

मुंबई - पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात अनेक एनजीओ काम करत आहेत. पण तेलंगणात राहणाऱ्या एका अवलियाने पर्यावरण संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय. पर्यावरणासाठी हा अवलिया चक्क कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सायकलने करत आहे. या अवलियाने यासाठी आपली आयटी इंजिनीयरची नोकरी सुद्धा सोडली. सेव्हींगमधील रक्कम आणि बँकेच्या लोनचा आधार घेत हा अवलिया भारतवारीवर निघला आहे. या अवलियाचे नाव आहे रविकिरण बडोला. रवी किरणचा प्रवास हा कन्या कुमारी, तामिळनाडू, बंगळुरु, मुंबई अशा बारा राज्यांमधून शेवटी जम्मू काश्मीर येथे संपणार अाहे. रवी गुरुवारी मुंबईत आला होता. 

कमीतकमी 100 दिवसांत हा प्रवास करण्याचा रवीचा मानस आहे. 30 एप्रिलपर्यंत हा प्रवास तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. एकूण 5000 किलोमीटरचा टप्पा असणाऱ्या या प्रवासाचा सध्या मुंबईत स्टे आहे. आत्तापर्यंत रवी किरण यांनी 2 हजार 700 किलोमीटर प्रवासाचा टप्पा पार केला आहे. 3 मार्चला म्हणजेच शुक्रवारी रविकिरण अहमदाबादसाठी निघणार आहे.

प्रवासादरम्यानचा खर्च दोन ते अडीच लाख रूपये एवढा असणार आहे. या प्रवासात रवी किरण याने अाहे त्या परिस्थितीत उर्वरित प्रवास सर करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी त्याने सायकल, मेडिसीन बॉक्स लागतील तेवढे पैसे, एक शॉल, पाणी बॉटलसारख्या जीवनावश्यक गोष्टी सोबत घेतल्या आहेत. या संपूर्ण प्रवासाला घरच्यांचा सुरुवातीला विरोध होता. पण त्याने घरच्यांचेही मन परिवर्तन केले.

रवी किरण यांनी प्रवासात शाळांना भेट दिली. शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या सहाय्याने कशा प्रकारे निसर्गाचे संवर्धन करता येईल याची माहिती दिली. मुंबईत अजून तरी कोणत्या शाळेला त्याने भेट दिलेली नाही. तसेच "भारतात होणाऱ्या त्सुनामी, भुकंप सारख्या घटना थांबवायच्या असतील तर पर्यावरण संवर्धन हा एकच उपाय आहे. त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा" असा संदेश रवीने दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा