Advertisement

'क्वीन्स नेकलेस'चा 'हा' इतिहास तुम्हाला माहित आहे का?


'क्वीन्स नेकलेस'चा 'हा' इतिहास तुम्हाला माहित आहे का?
SHARES
Advertisement

मुंबई शहराची ओळख दर्शवणाऱ्या अनेक जागा आहेत. त्यापैकी सर्वांचे मन मोहून घेणारी जागा म्हणजे ‘मरीन ड्राइव्ह’. मुंबईकरांनी एकदा तरी मरीन ड्राइव्हवर निवांत आणि आनंदाचे क्षण घालवले असतील. असा कुणी नसेल, ज्याला मुंबईतील मरीन ड्राइव्ह माहीत नसेल. या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला कट्टा. रस्त्याला लागून असलेल्या कट्ट्याच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला मोकळेपणाने फिरता येईल अशी विस्तीर्ण जागा आहे. समुद्राच्या हळुवार किंवा रौद्र लाटा पाहात निवांत क्षण घालवणाऱ्या असंख्य मुंबईकरांना या कठड्याची भुरळ पडली आहे.मरीन ड्राइव्ह हे नाव कसे पडले?

ब्रिटिश सरकारने गिरगाव चौपाटी ते चर्चगेट कोस्टल रोड तयार करण्याचे काम हाती घेतले. त्यानुसार या रस्त्याचे काम 18 डिसेंबर 1915 साली सुरू झाले. पीडब्ल्यूडी इंजिनिअर केनेडी यांच्या देखरेखीखाली या रस्त्याचे काम सुरू झाले. भागोजीशेठ कीर आणि पलोनजी मिस्त्री या दोन पारसी आर्किटेक्ट्सनी या रस्त्याची बांधणी केली. 4.8 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला 18 डिसेंबर 2015 साली शंभर वर्षे पूर्ण झाली. या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास पाच वर्षे लागली. 

केनेडी यांच्या निधनानंतर या रस्त्याला केनेडी सी-फेस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याचे सुभाषचंद्र बोस मार्ग असे नामांतरण करण्यात आले. पण आजही 'मरीन ड्राइव्ह' या नावाने हा रस्ता ओळखला जातो. पूर्वी या परिसरात ब्रिटिशांची मरीन बटालियन तुकडी (लाइन्स) तैनात होती. त्या परिसरात मरीन लाइन्सच्या कवायती होत. बटालियनच्या परेडमुळे त्याला मरीन ड्राइव्ह हे नाव पडले.मरीन ड्राइव्ह जवळील इमारतींचे वैशिष्ट्य

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला 1920 ते 1940 सालात प्रसिद्ध असलेल्या आर्ट डेको शैलीतील इमारतींचे संकुल आहे. अशा प्रकारच्या इमारती असलेले जगातील पहिले शहर अमेरिकेतील मियामी आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. या इमारतींच्या डिझाईनमध्ये जी. बी. म्हात्रे यांचा मोठा हात आहे. समान उंचीच्या इमारती, प्रत्येक मजल्यावर प्रशस्त बाल्कनी, खिडक्यांना संरक्षणासाठी लावलेले लोखंडी ग्रील हे या इमारतींचे वैशिष्ट्य आहे.क्वीन्स नेकलेस नाव कसे पडले?

‘मरीन ड्राइव्ह’वर लाइट लागल्यानंतर समुद्र किनाऱ्यालगतचा परिसर राणीच्या चंद्रहाराप्रमाणे दिसतो. म्हणूनच त्याला क्वीन्स नेकलेस अशी उपाधी मिळाली.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement