भव्य कोकण महोत्सव

wadala
भव्य कोकण महोत्सव
भव्य कोकण महोत्सव
भव्य कोकण महोत्सव
भव्य कोकण महोत्सव
भव्य कोकण महोत्सव
See all
मुंबई  -  

प्रतीक्षानगर- मनसे सायन कोळीवाडा विभाग आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर सायंकाळी ७ ते १० पर्यंत प्रतीक्षानगर १ येथे हा महोत्सव सुरु राहणार आहे. या कोकण महोत्सवाचे यंदाचे ३ रे वर्ष असून अत्यंत उत्साहात या भव्य महोत्सवाला सुरुवात झालीय. या महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध अश्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे. पापड, लोणचे, कोंबडी वड्याचे पीठ, कुरडया, कोकणी मसाले या सर्वांचे स्टॉल या कोकण महोत्सवात लावण्यात आलेत. त्याचबरोबर कोकणी पदार्थांचे चविष्ट असे हॉटेल सुद्धा येथे असून लोकांना कोकणातील पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. हा महोत्सव ८ दिवस चालणार असून या प्रत्येक दिवसात विविध कार्यक्रमांचा म्हणजेच लावणी, मॅजिक शो, दशावतारी नाटक, मराठी/हिंदी ऑर्केस्ट्राचा समावेश आहे. 'गेली २ वर्ष फेब्रुवारीत कोकण महोत्सवाला सुरुवात होते, मात्र निवडणुकीचा काळ लक्षात घेता ऑक्टोबर महिन्यात हा महोत्सव सुरू करण्यात आला त्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना (सायन कोळीवाडा) उपविभाग संघटक 'सुनील मेमाणे' यांनी सांगितलं'.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.