Advertisement

मुसळधार पावसात वडापाव विक्रेत्यांची लाॅटरी


मुसळधार पावसात वडापाव विक्रेत्यांची लाॅटरी
SHARES

गेले दोन दिवस मुंबईत कोसळलेल्या पावसाचा फटका सर्वांना बसला असला, तरी वडापाव विक्रेत्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. कारण जोरदार पावसात खुसखुशीत वडा, भजी आणि चहा याला सर्वजण नेहमीच पसंती देतात. त्याप्रमाणे दोन दिवस पडलेल्या पावसातही खमंग वडापावावर अनेकांनी ताव मारला. परिणामी वडा पाववाल्यांचा जबरदस्त धंदा झाला एका अर्थाने त्यांना धो धो पावसात लॉटरीच लागली, असे म्हणायला हरकत नाही.    

दादर, प्रभादेवी आणि वरळीमधील प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांशी चर्चा केल्यानंतर या दोन दिवसात झालेल्या पावसात लोकांनी मोठ्या प्रमाणात वडापावला आपली पसंती दाखवल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली


दादरच्या कीर्ती काॅलेजजवळचा अशोक वडापाव

गेल्या अनेक वर्षापासून या वडापावने लोकांचे मन जिंकून घेतले आहे. काॅलेजशेजारी हा वडापाव असल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये या वडापावची मोठी क्रेझ आहे. परदेशी नागरिकदेखील आवर्जून इथला वडापाव खातात. विशेष म्हणजे हा वडापाव परदेशातही पाठवला जातो, असे मालक अशोक ठाकूर यांनी सांगितले. 


दोन दिवसांतील मुसळधार पावसात ग्राहकांनी वडापावला चांगलीच पसंती दिली. हा वडापाव बर्गर, झटपट आणि खिशाला परवडणारा आहे. अशोक भाई पावसात थकल्यावर तुमचा वडापाव खाल्यामुळे ताकद मिळाली आणि आम्ही घरी देखील पोहोचलो, अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी आम्हाला दिली.

- अशोक ठाकूर, विक्रेता



प्रभादेवीतील सारंग बंधू वडापाव

प्रभादेवीतील सारंग बंधू वडापावला देखील ग्राहक पसंती देतात. याचे मालक किसन सारंग म्हणतात, ''येथे नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. पण दोन दिवस सलग पाऊस पडत असल्याने खरेतर लोकांना त्रास झाला. अशा आपत्कालीन प्रसंगी आम्ही मदत करतो, पैसे नसतील तर उद्या द्या असे आम्ही ग्राहकांना म्हणतो. कारण जे काही होते ते निसर्गामुळे होते. अशा वेळेत पैसे महत्त्वाचे नाही तर ग्राहक महत्त्वाचे आहेत.''

 



मंचेकर वडापाव, वरळी

वरळीतील मंचेकर वडापाव हे देखील मुंबईतील प्रसिद्ध वडापाव सेंटर आहे. गेल्या अनेक वर्षापासून जांबोरी मैदानाच्या समोर या वडापावचे दुकान आहे. या वडापावला देखील ग्राहकांची मोठी पसंती दिली आहे. आजही ती कायम टिकून आहे. मंगळवारी आणि बुधवारी पडलेल्या पावसामुळे मंचेकर वडापावला ग्राहकांचा प्रतिसाद जोरदार मिळाला, असे मंचेकर यांनी सांगितले.





डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा