'तो' कुठेही डान्स करतो...आणि हंगामा होतो!

Mumbai
'तो' कुठेही डान्स करतो...आणि हंगामा होतो!
'तो' कुठेही डान्स करतो...आणि हंगामा होतो!
'तो' कुठेही डान्स करतो...आणि हंगामा होतो!
See all
मुंबई  -  

'किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायेनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में जुट जाती है' अभिनेता शाहरुखच्या 'ओम शांती ओम' या सिनेमातील हा प्रसिद्ध डायलॉग आपल्या सर्वांनाच परिचित असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही असेच काहीसे घडले आहे, ते मिरा रोडमध्ये राहणाऱ्या भरत रागठीसोबत.

भरतला डान्सची भलतीच आवड आहे. तो कुठेही आणि कधीही डान्स करू शकतो, तेही कोणत्याही पूर्वतयारीशिवाय. इतकेच नाही तर, तो डान्स करत असताना त्याच्या अवती भवती बघ्यांची एकच गर्दी जमते आणि होतो टाळ्यांचा कडकडाट.  

विशेष म्हणजे भरतने काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडिओ यू-ट्युबवर अपलोड केला होता. या व्हिडिओत तो रेल्वेच्या लोकल डब्यात डान्स करताना दिसतो. खरेतर हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काहींना तर हा व्हिडिओ इतका आवडला की, त्यांनी फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवरही तो शेअर केला आहे.

20 वर्षांच्या भरतने नुकतीच मुंबईच्या एच आर कॉलेजमधून टीवाय बीकॉमची परीक्षा दिली. गेल्या अनेक वर्षांपासून भरतला डान्सची प्रचंड आवड आहे. तो नेहमी आपल्या मोठ्या भावाला डान्स करताना बघायचा. पुढे मोठ्या भावाच्या पावलांवर पाऊल ठेऊन भरतने डान्सलाच सर्व काही मानले. पण भरतचा मोठा भाऊ सागर याच्यासोबत एक अपघात घडला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे सागर आता डान्स करू शकत नाही. तो एक खासगी नोकरी करतोय. पण तरीही भरतने डान्सबद्दल असलेली त्याची आवड किंचितही कमी होऊ दिली नाही.


तो कोणत्याही खासगी क्लासशिवाय डान्स शिकला. त्याचे वडील हे प्रोफेशन मार्शल आर्टचे ट्रेनर आहेत. त्यांच्याकडेच पाहून भरतनेही डान्सचे गुण आत्मसात केले. ज्यानंतर तो मार्शल आर्टचा वापर आपल्या डान्समध्ये करू लागला.


लोकल सारख्या सार्वजनिक ठिकाणी डान्स करताना कोणतीही पूर्व तयारी केली नव्हती. जेव्हा इच्छा होते तेव्हा डान्स करतो आणि ते रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर अपलोडही करतो. तसेच सोशल मीडिया हे सर्वांपर्यंत पोहचणारे माध्यम आहे. त्यामुळे कदाचित माझे हे डान्स पाहून कुणी मला एखादी संधी जरुर देईल. 

- भरत रागठीतो पुढे म्हणाला 'अनेकदा लोक माझ्या डान्सची प्रशंसा करतात. स्टेशनवर डान्स करताना अनेक लोक माझा डान्स बघतात. याशिवाय झोपडपट्टीसारख्या वस्तीत जाऊन तिथल्या लहान मुलांसोबत मी डान्स करतो. हे व्हिडिओ तयार आणि अपलोड करणारी अशी कोणतीही प्रोफेशनल टीम आपल्याकडे नाही. वेळ मिळेल तेव्हा भाऊ आणि मी हा व्हिडिओ तयार करतो आणि यु-ट्यूबवर अपलोड करतो'.


भरतने इतक्या कमी वयात सोशल मीडियावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या डान्सच्या व्हिडिओला लाखो लोकांनी पसंती देत शेअरही केले आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.