Advertisement

पेंटबॉल खेळाल तर बाकी गेम विसराल!


पेंटबॉल खेळाल तर बाकी गेम विसराल!
SHARES

सध्याच्या तरुणाईला साहसी खेळ किंवा साहसी प्रकार अधिक आवडतात. त्यामुळेच सुट्टीच्या काळात या तरुणाईची पाऊले ट्रेकिंग, जंगलभ्रमंती करण्याकडे वळतात. पण तरुणाईला आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे...आणि तो म्हणजे पेंटबॉल! पेंटबॉल या खेळाची परदेशात प्रचंड क्रेझ आहे.



१९८० च्या दशकात मनोरंजन म्हणून हा खेळ विकसित केला गेलापण आजकल पेंटबॉल या खेळाच्या स्पर्धा देखील आयोजित होतातहा खेळ खेळण्यासाठी व्यावसायिक संघटना आणि खेळाडू देखील आहेतपेंटबॉल हा खेळ सैन्य दलामध्ये देखील सरावासाठी खेळला जातो.


पेंटबॉल कसा खेळतात?

तुम्ही हा खेळ ग्रुपनं खेळू शकता. मित्र-मैत्रिणींना घेऊन गेलात तर एक चांगला खेळ तुम्हाला खेळता येईल. तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर शुटिंगचे खेळ तर खेळलाच असाल. तसाच काहीसा हा खेळ आहे. यामध्ये संरक्षण म्हणून तुमचा चेहरा हेल्मेटनं झाकला जातो. तुम्हाला जॅकेट देखील घालायला दिलं जातं.



या खेळात दोन ग्रुप केले जातात. एका ग्रुपनं दुसऱ्या ग्रुपच्या सदस्यांना बंदूकीच्या मदतीनं कलरचे बॉल मारायचे असतात. हेल्मेट आणि जाडसर कपड्यांमुळे तुम्हाला कलरचे बॉल लागत नाहीत. पण जर विरोधी ग्रुपमधल्या सदस्याला मारलेला बॉल लागला, तर तुम्हाला पॉईंट मिळतो. एका खेळाडूला २५ पेंटबॉलसाठी ३२० रुपये मोजावे लागतील. ५० पेंटबॉलसाठी ५१० रुपये तर १०० बॉलसाठी ७७० रुपये भरायचे आहेत.



कुठे खेळाल?

पेंटबॉल खेळण्यासाठी तुम्ही पवईतल्या हिरानंदानी गार्डनच्या हाकोन एन्टरटेन्मेंट सेंटरला भेट देऊ शकता. इथं या खेळासाठी स्निपर टॉवर, बंकर असं बरंच काही उभारण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा खेळ खेळायला मजा येईल. अधिक माहितीसाठी हाकोनच्या http://www.hakonefun.com/ वेबसाईलाही भेट देऊ शकता.



हेही वाचा

फिटनेस आणि धम्माल म्हणजे ट्रॅम्पोलिन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा