फिटनेस आणि धम्माल म्हणजे ट्रॅम्पोलिन!


  • फिटनेस आणि धम्माल म्हणजे ट्रॅम्पोलिन!
  • फिटनेस आणि धम्माल म्हणजे ट्रॅम्पोलिन!
SHARE

सुट्टी म्हणजे मजा... पण याच सुट्टीचा उपयोग अनेक प्रकारचे खेळ जाणून घेण्यासाठी, त्यापासून शरीराचा चांगला व्यायाम होण्यासाठी करता येऊ शकेल. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सुटीच्या काळातही मुलांनी मैदानी खेळांवर भर द्यायला पाहिजे. पण बदलत्या जीवनशैलीमुळे शारिरीक कष्ट करायचं सगळ्यांनी सोडूनच दिलंय. पूर्वी मैदानी खेळांवर मुलं अवलंबून राहायची. पण आता त्यांची जागा मोबाईल, व्हिडिओ गेम्स, टीव्ही अशा अनेक मनोरंजनाच्या साधनांनी घेतली आहे. पण आज आम्ही तुम्हाला असा गेम सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मनोरंजन आणि व्यायाम दोन्ही गोष्टी साधता येणार आहेत. या गेमचं नाव आहे 'ट्रॅम्पोलिन'!ट्रॅम्पोलिन म्हणजे काय?

वर्कआऊट आणि मज्जा यांचा मेळ म्हणजेच ट्रॅम्पोलिन! यात एक मॅट असते. त्या मॅटवर तुम्ही उड्या मारल्या की पुन्हा हवेत फेकले जाता. या मॅटवर तुम्ही बास्केटबॉल देखील खेळू शकता. ट्रॅम्पोलिन सुरक्षित तर आहेच यासोबतच तुमच्या शरीरातील सांधेही ताणरहित राहतात. जेव्हा जमिनीवर धावता किंवा व्यायाम करता तेव्हा पायांच्या घर्षणानं निर्माण होणारी ऊर्जा शरीरातून येत असते. पण ट्रॅम्पोलिनमध्ये मॅटच ही परिणामी ऊर्जा जास्त काळापर्यंत शोषून घेत असते. त्यामुळे सांध्यांवर त्याचा परिणाम होत नाही. 

फक्त ट्रॅम्पोलिनच नाही तर यासोबतच तुम्ही 'फोम पिट' आणि 'रॉक क्लाएम्बिंग'चा देखील आनंद घेऊ शकता. फोम पिट म्हणजे सॉफ्ट असे चौकोनी आकाराचे ठोकळे. या ठोकळ्यांवर पडलात तरी तुम्हाला काही लागणार नाही.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व हा गेम खेळू शकतात. सोमवार ते गुरुवार तुम्ही या ठिकाणी गेलात तर एका तासासाठी ४०० रुपये तिकीट आहे. तर शुक्रवार ते रविवार एका तासासाठी ४५० रुपये तुम्हाला मोजावे लागतील. याशिवाय तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही पूर्ण जागा बुक करू शकता. यासाठी तुम्हाला १०,००० ते १२,००० रुपये मोजावे लागतील.कुठे आहे?

जर तुम्हाला या गेम्सचा आनंद लुटायचा असेल तर घाटकोपरच्या आर सिटी मॉलला भेट द्या. आर सिटी मॉलमध्ये सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत 'फन ओ फॅक्टरी' इथं तुम्हाला हे गेम्स अनुभवता येणार आहेत.हेही वाचा

मुंबईत पहिल्यांदाच रंगणार 'मेरी मॅगी' फेस्टिव्हल


संबंधित विषय
ताज्या बातम्या