'चतुर वहिनी' स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न

 Mulund
'चतुर वहिनी' स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न
'चतुर वहिनी' स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न
'चतुर वहिनी' स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न
See all
Mulund, Mumbai  -  

मुलुंड - गेला महिनाभर चाललेल्या 'चतुर वहिनी' या स्पर्धेचा रविवारी म्हाडा कॉलनीत अंतिम सामना झाला. मनसे नेते सत्यवान दळवी यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मुलुंड मधील एकूण 55 महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामधून 9 महिला विविध स्पर्धा पार करत अंतिम सामन्यात दाखल झाल्या. या 9 महिलांमध्ये अंतिम सामना चांगलाच चुरशीचा ठरला. सामान्य ज्ञान तसंच गायन स्पर्धा पार केलेल्या 3 महिलांना विजयी घोषित करण्यात आलं. या स्पर्धेत प्राची कदम यांनी पहिला क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक प्रीती भालेकर आणि तृतीय क्रमांक साक्षी सुर्वे यांनी पटकावला. विजेत्या चतुर वहिनींना सोन्याची नथ , सन्मान चिन्ह , धनादेश आणि पतंजली गिफ्ट हॅम्पर देऊन गौरवण्यात आलं.

Loading Comments