• दोन रुपयांत गारेगार पाणी
SHARE

मरिन लाईन्स - रेल्वेचा प्रवास करत असताना तहान लागल्यास स्टेशनवरच थंडगार पाण्याची सोय करण्यात आलीय. रेल्वे प्रशासनानं स्टेशन्सवर यू.एफ थंड पाणी विक्री केंद्राची सुरुवात केली. मरिन लाईन्स, चर्नीरोड आणि ग्रांटरोड स्थानकांवर या मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. या मशीनमध्ये 2 रुपये टाकले की पाणी मिळतं अशी सिस्टम बसवण्यात आलीय. जर पैसे टाकून पाणी मिळालं नाही, तर गारेगार पाणी द्यायला एका व्यक्तीला नेमण्यात आलंय. प्रशासनाच्या या थंडगार पाणी विक्री केंद्राला प्रवाशांचाही मोठा प्रतिसाद मिळतोय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या