हेयर स्टायलिंगची अनोखी दुनिया...

BEST depot, Mumbai  -  

कुलाबा - अलेक्झांडर कॅल्विओ हे कुलाब्यातल्या फॅशन वर्तुळातलं सुपरिचित नाव. आघाडीचे हेयर स्टायलिस्ट म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. 25 वर्षांपासून त्यांनी अनेकांचे लुक चेंज केलेत.

युरोपमधील प्रतिष्ठित ब्रँड असलेल्या रोस्सेनो फेरेट्टी यांच्यासोबतही त्यांनी काम केलंय. कॅल्विओ यांनी जगात प्रसिद्ध आणि श्रीमंत म्हणून नावाजलेले प्रिन्स आणि टॅस्कनीं यांचंही लक्ष आकर्षित करून घेतलंय. ते त्यांच्याकडे हेअरकटसाठी येणाऱ्या प्रत्येकाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतात आणि त्यांचं व्यक्तिमत्व खुलून दिसावं यासाठी प्रयत्नशील असतात. महिलांच्या हेयर स्टाइलसाठी ते फक्त 265 युरो घेतात... पुरुषांच्या केशरचनेसाठी मात्र 125 युरोच मोजावे लागतात

Loading Comments