अर्चना शंभरकर यांची 'सोलमेट' प्रकाशित

  Dadar
  अर्चना शंभरकर यांची 'सोलमेट' प्रकाशित
  मुंबई  -  

  दादर - मंत्रालयातील माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहाय्यक संचालक अर्चना शंभरकर यांची सोलमेट ही कादंबरी रविवार, 25 डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली. दादरच्या कीर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात साहित्य क्षेत्रातील दिग्जांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला.

  ग्रंथालीच्या 42 व्या वाचक दिनानिमित्त आयोजित वाचक मेळाव्यात सतिश काळसेकर, गुरुनाथ सामंत, वसंत दत्तात्रय गुजर या दिग्गज साहित्यिकांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत पत्रकारिता आणि नंतर मंत्रालयात प्रसिद्धी विभागात काम करणाऱ्या अर्चना शंभरकर यांच्या या कादंबरीला गुजरात दंगलीच्या काळात अंकुरलेल्या त्याग आणि समर्पणाच्या कहाणीची पार्श्वभूमी आहे. शंभरकर यांच्या या पहिल्या अभिनव कलाअविष्काराला ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांचं आशीर्वचन असून बिनधास्त लेखन शैलीला ज्येष्ठ नाटककार अभिराम भडकमकर यांची प्रस्तावना आहे. ग्रंथालीतर्फे प्रकाशित या कादंबरीचं मूल्य 150 रुपये असून सर्व स्टॅाल्स तसंच बुकगंगा या वेबसाइटवरही ती उपलब्ध आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.