Lok Sabha Election Mumbai 2019 Results

मुंबईतल्या या नाईट मार्केटला नक्की भेट द्या!


SHARE

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी...जगभरातून अनेक पर्यटक एकदा का होईना पण मुंबई दर्शन करतातच. याच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत नाईट बाजार ही संकल्पना रुजू झाली. असाच एक नाईट बाजार मुंबईत देखील सुरू होणार आहे. बंगळुरुत यशस्वी झाल्यानंतर 'स्टेपिन आऊट नाईट मार्केट' मुंबईत येण्यास सज्ज झालं आहे.

'स्टेपिन आऊट नाईट मार्केटएप्रिलमध्ये भरणार आहे. अभिनेत्री श्वेता साळवीनं काही कंपन्यांसोबत मिळून नाईट बाजारचं आयोजन केलं आहे. फक्त शॉपिंगच नाही, तर खाण्या-पिण्यापासून सर्वच गोष्टींची चंगळ इथं असणार आहे. चित्रपट पाहण्याची संधी देखील तुम्हाला इथं मिळणार आहे. याशिवाय वर्कशॉप, डिस्को, म्युझिकगेम्स असं बरंच काही तुम्हाला अनुभवता येणार आहे.

जर तुम्हाला एकाच छताखाली शॉपिंग, फूड आणि म्युझिकचा आनंद लुटायचा असेल, तर 'स्टेपिन आऊट नाईट मार्केट'ला नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबियांसोबत इथे चांगला वेळ घालवू शकता. यासाठी बुक माय शोवर तुम्ही तिकीटही बुक करू शकता. यासाठी तुम्हाला २४९ रुपये मोजावे लागतील.


कुठे - ताज लँड्स अॅण्ड लॉन्स

कधी - २८ एप्रिल, २०१८

वेळ - दुपारी ३ ते रात्री १ वाजेपर्यंत


हेही वाचा

मग येणार का 'नौ से बारा'?


संबंधित विषय