Advertisement

तरुणींसाठी झुमक्यांचा ट्रेंड


तरुणींसाठी झुमक्यांचा ट्रेंड
SHARES

तरुणाईला फॅशनसाठी काही विशेष औचित्य शोधण्याची आवश्यकता नसते. कारण मुंबई शहरात एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक राहतात, त्यामुळे साहजिकच त्यांचे सण समारंभ सर्व मुंबई करांचे होतात.. आता गणेशोत्सव जवळ आला असल्यामुळे पारंपारीक साड्या किंवा पंजाबी ड्रेस यांना शोभतील आणि सहज मॅचिंग होतील असे फॅंन्सी झुमके दादरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हे झुमके गोल्डन , सिलव्हर कलर सोबतच मल्टी कलर मध्ये देखील उपलब्ध आहेत. गोल झुमके, खड्यांचे झुमके त्याचबरोबर ड्रेसवर सहज वापरता यावेत याकरता वेगवेगळे कानातले देखील मार्केटमध्ये आहेत. वजनाने अगदी हलके असलेले हे झुमके दादर मार्केटमध्ये गुजरात येथील राजकोट येथून मागवण्यात आले आहेत. मार्केटमधील शॉपमध्ये या झुमक्यांची किंमत 60 रुपये ते 150 रुपयांपर्यंत आहे. परंतु ज्या तरुणींना हे झुमके फक्त सणवारांना घालायचे आहेत, त्यांच्यासाठी वीर कोतवाल उद्यानच्या फुटपाथवर असलेल्या स्टॉलवर 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत हे झुमके उपलब्ध आहेत.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा