Advertisement

१५ ऑगस्ट, रक्षाबंधनसोबत येणारा विकेंड 'असा' घालवा कुटुंबियांसोबत...

तुमच्याकडे लाँग विकेंड नसला तरी १५ ऑगस्टला काय करू शकता? एका दिवसात कुठे भटकंती करू शकता? याबद्दल देखील आम्ही सांगणार आहोत. स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी नसली तरी आमचा प्लॅन बी तयार आहे, तो म्हणजे तुम्ही कुटुंबियांसोबत एखादा छानसा चित्रपट पाहू शकता.

१५ ऑगस्ट, रक्षाबंधनसोबत येणारा विकेंड 'असा' घालवा कुटुंबियांसोबत...
SHARES

यंदा पाऊस चांगला कोसळत असल्यानं ट्रेकर्स तसंच भटकंतीची आवड असलेली मंडळींसाठी पर्वणी आहे. त्यात लागून सुट्ट्या आल्यानं तर धम्मालच आहे. १५ ऑगस्ट म्हणजे गुरुवारी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सर्वांना सुट्टी आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिन साजरा करून झाला की तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. फक्त तुम्हाला शुक्रवार, शनिवार सुट्टी पाहिजे

तुमच्याकडे लाँग विकेंड नसला तरी १५ ऑगस्टला काय करू शकता? एका दिवसात कुठे भटकंती करू शकता? याबद्दल देखील आम्ही सांगणार आहोत. स्वातंत्र्यदिनानिमित्त  सुट्टी नसली तरी आमचा प्लॅन बी  तयार आहे, तो म्हणजे तुम्ही कुटुंबियांसोबत एखादा छानसा चित्रपट पाहू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला १५ ऑगस्टला कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत हे देखील आम्ही सांगणार आहोत


सुट्टीमध्ये कुठं लांब जाण्याचं प्लॅनिंग केलं नसेल, तरी लाँग वीकेंडचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मुंबई जवळ काही मस्त ठिकाणं आहेत. या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून घेत अगदी एक-दोन दिवसांत जाऊन येता येईल.


) माथेरान

मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलं आहे


संपूर्ण माथा विविध तसंच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला हा परिसर आहे. पावसामुळं माथेरान हिरवंगार झालेलं आहे. ठिकठिकाणी धबधबेही दिसतात. जून ते ऑगस्ट या काळात इथं जोरदार पाऊस पडतो. या काळात धुक्याचं साम्राज्य संपूर्ण माथेरानवर असतं. माथेरानमध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत

मुंबईपासून १०३ किलोमीटरवर


) अलिबाग

अलिबाग मिनी गोवा म्हणूनही ओळखला जातो. मुंबईपासून दक्षिणेला ७८ कि.मी. आणि पेणपासून ३० कि.मी. अंतरावर आहे. अलिबाग या शहराला समुद्र किनारा आहे


अलिबागच्या बीचला लागूनच कुलाबा किल्ला आहे. तर अलिबागपासून काही किलोमीटरवर काशीद बीच आहे. अलिबागला आलेल्यांनी या बीचला भेट द्यायलाच हवी. जर तुमच्याजवळ वेळ असला तर तुम्ही मुरूड जंजिरा किल्ल्याला आवश्य भेट द्या. 

मुंबईपासून ९५ किलोमीटरवर


) कामशेत

कामशेत हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात येतं. इथं तुम्ही पॅराग्लायडींग व ट्रेकींगचा थरार अनुभवता येऊ शकतो. 

मुंबईपासून १०८ किमी


) रायगड किल्ला

किल्ले रायगड रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. शिवराज्याभिषेक हा रायगडानं अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे.


किल्ल्यावर पाहण्यासारखं बरंच काही आहे. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, महादरवाजा, हत्ती तलाव, स्तंभ, शिरकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, टकमक टोक असं बरंच काही तुम्ही किल्ल्यावर पाहू शकता. गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे. याशिवाय खाण्याची आणि पिण्याची देखील सोय गडावर आहे.

मुंबईपासून १०३ किलोमीटर


) कोलाड

रायगड जिल्ह्यातील कोलाड हे ठिकाण त्याच्या कुंडलिका नदीमधील व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि ट्रेकिंगच्या पायवाटांसाठीही प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या पुढ्यात वसलेले आणि मुंबईपासून जवळ असलेलं कोलाड हे नेहमीच साहसी क्रीडाप्रकारांनी गजबजलेले असतं.

राफ्टिंगशिवाय इथं निवड करण्यासाठी कॅनोइंग, कायाकिंग, रिव्हर झिप लाईन क्रॉसिंगचे पर्यायही उपलब्ध आहेत. वॉटरफॉल रॅपलिंग आणि माउंटन बायकिंग यासारख्या क्रीडाप्रकारांकडे साहसी क्रीडाप्रकारांचे चाहते आकर्षित होऊन कोलाडला येत असतात.

मुंबईपासून १२६ किलोमीटर


लाँग विकेंडला जाणाऱ्यांना तर चांगलेच पर्याय दिले. पण लाँग विकेंड नसणाऱ्यांचं काय? १५ ऑगस्ट फक्त एक दिवस सुट्टी. मग एका दिवसात काय फिरणार आणि काय धम्माल करणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तुमची ही समस्या देखील आम्ही दूर करतो


) द हाऊस ऑफ मिसळ


दादरच्या प्लाझा सिनेमागृहाजवळ असलेलं द हाऊस ऑफ मिसळने त्यांच्या मेन्यूमध्ये एक हटके पदार्थ समाविष्ट केला आहे. १५ ऑगस्टसाठी त्यांनी तिरंगा मिसळ लाँच केली आहे.  


) लोटस कॅफे

जुहूमधील जे.डब्ल्यू मॅरियट इथल्या लोटस कॅफेला तुम्ही भेट देऊ शकता. १५ ऑगस्ट आणि रक्षाबंधन या दोन्ही सणांचे औचित्य साधत वेगवेगळे पदार्थ नव्या रूपात तुमच्या समोर सादर केले आहेत. कुटुंबियांसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता.


आम पन्ना, मसाला छास, गुलाब लस्सी, तिरंगा पुलाव, निहारी, गलौटी, तवे का कुलचा, तिरंगा डिमसम, तिरंगा पॅनकेक स्टॅक विथ बनाना कॅरेमल, मिश्ती डोई, चॉकलेट समोसा आणि पिस्ता यासारखे पदार्थ तुम्हाला चाखता येतील.


) सोडा बॉटल ओपनरवाला

सोडा बॉटल ओपनरवाला या रेस्टॉरंटच्या सर्व शाखांमध्ये तुम्ही १५ ऑगस्ट साजरा करू शकता. स्वातंत्र दिनाच्या सन्मानार्थ सोडा बॉटल ओपनरवाला रेस्टॉरंटनं एक विशेष ऑफर आणली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी तर इथं नक्कीच जायला हवं. कारण तुमच्यासाठीच तर एक भन्नाट ऑफर आहे.  


आपण ७२ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. त्यामुळे ७२ किंवा ७२ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना ७२ टक्के सूट मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक सोडा बॉटल ओपनरवाला रेस्टॉरंटच्या सर्व शाखांना भेट देऊ शकतात.


) वाया बॉम्बे

१५ ऑगस्ट निमित्त वाया बॉम्बे हे रेस्टॉरंट भारताची खाद्यसंस्कृती तुमच्यासमोर सादर करत आहेत. वाया बॉम्बेनं कल्चरल थाळी लाँच केली आहे. या थाळीमध्ये आपली खाद्यसंस्कृती पाहायला मिळेल. महाराष्ट्रीयन, पंजाबी, गोअन, सिंधी आणि गुजराती असे पदार्थ असतील. विविधतेत एकता हा संदेश देण्याचा प्रयत्न वाया बॉम्बेनं केला आहे.

व्हेज थाळी आणि नॉनव्हेज थाळी असे दोन पर्याय तुमच्याकडे आहेत. व्हेज थाळीमध्ये साबुदाणा वडा, काळीमिरी आलू, पनीर टिक्का मसाला, सेव टमाटर की सब्जी, सिंधी कडी, दम की काली दाल, पिंड दे छोले, थ्री कलर ढोकळा, भात, चपाती, दही, छास, कोशिंबिर, पापड असा भरगच्च मेन्यू असणार आहे. यासाठी तुम्हाला ५९९ रुपये आकारावे लागतील.

तर नॉनव्हेज थाळीमध्ये सुकट भजिया, चिकन कोथमिर, आंद्रा चिकन, सिंधी मटन, गोअन कोळंबी कडी, बटर चिकन, थ्री कलर ढोकळा, दम की काली दाल, सलाड, दही, भात, चपाती, छास, पापड अशी भरगच्च थाळी तुम्हाला ६९९ रुपयांत मिळेल


) ले कॅफे


स्वातंत्र दिनानिमित्त ले कॅफेनं त्यांच्या मेन्यूमध्ये काही हटके पदार्थ आणले आहेत. त्यापैकी एक म्हणजे थ्री कलर वॉफल... अवघ्या ७३ रुपयामध्ये तुम्ही या वॉफलचा आनंद घेऊ शकता.


१५ ऑगस्टचं औचित्य साधत काही चित्रपट देखील प्रदर्शित होत आहेत. लाँग व्हिकेंडला फिरायला जाणं शक्य नसेल किंवा जेवायला जाणं देखील शक्य नसेल तर कुटुंबियांसोबत एखादा चांगला चित्रपट पाहू शकतोच


) मिशन मंगल

'मिशन मंगल' हा देशभक्तीची भावना जागृत करणारा असल्यानं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तो प्रदर्शित होत आहे. ५ नोव्हेंबर २०१३ मध्ये इस्रोकडून लाँच करण्यात आलेल्या मंगळ यानावर हा चित्रपट आधारित आहे. महिला सक्षमीकरण आणि देशभक्ती अशा मुद्द्यांवर हा चित्रपट भाष्य करतो.


'मिशन मंगल' चित्रपटात अक्षय कुमारसोबत सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ती कुल्हाडी आणि शर्मन जोशी मुख्य भूमिकेत दिसत आहेत.


) बाटला हाऊस

स्वातंत्र दिनाच्या मुहुर्तावर बाटला हाऊस हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. १९ सप्टेंबर २००८ साली  दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये दिल्ली पोलिसांनी एक एन्काउंटर केलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण देशात दिल्ली पोलिसांविरोधात आवाज उठवला गेला होता


या एन्काउंटरला काही लोकांनी खोटं ठरवलं तर काहींनी मारले गेलेल्या लोकांना दहशतवादी असल्याचं सांगितलं. त्यावर हा चित्रपट आाधारीत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम आहे.


) वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड ( इंग्रजी)

हॉलिवूडचे चित्रपटांना जगभरात चांगली पसंती मिळते. त्यापकीच एक आहे वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड. हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात लियोनार्डो डी कॅप्रियो आणि ब्रँड पिट मुख्य भूमिकेत आहेत.


१९६९ साली हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा खून करण्यात आला होता. ही मर्डर मिस्त्री कशा प्रकारे सोडवली जाते? तिच्या खुनामागे कोण असतं? हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे


सेक्रेड गेम्स ( Sacred Games)

सर्वात शेवटचं पण महत्त्वाचं तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी काहीच करता येत नसेल. तर सेक्रेड गेम्स हा देखील पर्याय तुमच्याकडे आहे. १५ ऑगस्टच्या मुहर्तावर सेक्रेड गेम्स नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे


नेमकं गणेश गायतोंडेचा काय प्लॅन असतो? २५ दिवसांनंतर काय होणार असतं? याची उत्सुकता आता लवकरच संपेल.


हेही वाचा

राखीनंतर आता सीड तिरंग्याची क्रेझ, साजरा करा पर्यावरणपूरक स्वातंत्रदिन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा