Advertisement

'या' गोष्टी लक्षात ठेवूनच इमेल पाठवा


'या' गोष्टी लक्षात ठेवूनच इमेल पाठवा
SHARES

ऑफिशियल कम्युनिकेशन करायचं झालं की आजकाल इमेलचा अधिक वापर होताना दिसतो. ऑफिसमध्ये सुट्टी हवी असो किंवा इतर कुठलं काम असो इमेल करावाच लागतो. अगदी नोकरीसाठी दुसरीकडे अप्लाय करायचा असला तरी ई-मेलचा वापर केला जातो. यामुळे आपलं एकमेकांसोबत कम्युनिकेशन करणं सोपं झालं आहे.

फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन हे आपण अनेकदा ऐकलं असेल. ई-मेलच्या बाबतीतही असचं काहीसं आहे. अनेकदा तुम्ही कशाप्रकारे ई-मेल लिहून पाठवता यावरून देखील तुमच्या व्यक्तिमत्वाची झलक समोरच्याला कळते. यासाठी प्रोफेशनल वे मध्ये तुमचा ई-मेल ड्राफ्ट करणं आवश्यक आहे. जेणेकरून जिथे तुम्ही ई-मेल पाठवाल तिकडे तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. यासाठीच ई-मेल ड्राफ्ट बनवण्यासाठी आम्ही काही टिप्स देणार आहोत.


विषयाशी निगडीत  ई-मेल

सर्वप्रथम विषयाला धरूनच तुमचा ई-मेल असावा. उगाच फाफट पसारा नसावा.  ई-मेलमध्ये सब्जेक्ट हा पर्याय असतो. त्यामध्ये ई-मेलला लिहिण्याचा विषय काय आहे हे नमुद करावं.  ई-मेलचा विषय आणि तुम्ही खाली लिहिलेला मसुदा यात फरक नसावा.


मजकूर लहान असावा

 ई-मेलचा मजकूर शक्यतो लहान असल्यास उत्तम, ज्यामुळे आजकाल अनेकदा स्मार्टफोनवरून  ई-मेल पाहिले जातात. त्यामुळे ‘ऑफिशियल कम्युनिकेशन’मधील मजकूर हा छोटा, पण नेमका असा असावा. म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे, हे नेमक्या मुद्द्यांत, शब्दांत मांडता आले पाहिजे.


सहज भाषा वापरा

प्रत्येक  ई-मेल करताना वेगळ्या भाषेची गरज असते. आपण ज्याला मेल करत आहोत त्याला डोळ्यासमोर ठेवून भाषेची निवड करावी. कारण आपल्या भाषेचा पोत कशा प्रकारचा आहे, त्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे शब्दांची योग्य निवड महत्त्वाची ठरते.


हेही वाचा

तुमच्या महत्त्वाच्या डॉक्यूमेंट्ससाठी डिजीलॉकरचा नवा पर्याय

सर्वांची खबर ठेवणाऱ्या गुगलच्या या ट्रिक्स जाणून घ्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा