Advertisement

बुटातून दुर्गंधी येतेय? मग या ट्रिक्स ट्राय करा


बुटातून दुर्गंधी येतेय? मग या ट्रिक्स ट्राय करा
SHARES

उन्हाळा असो वा हिवाळा आपल्यापैकी अनेकांना पायांना घाम येतो. त्यामुळे बुट किंवा चप्पल काढली की एकच दुर्गंध पसरतो. समजा दुर्गंध तुमच्या बुटातून येत असल्याचं कळाल्यास तर लाजल्यासारखं वाटतं. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत या अमलात आणाल तर फायद्यात राहाल.


१) एकच मोजे रोज घालणे टाळा. रोज धुतलेले स्वच्छ मोजे घाला. मोज्यात बॅक्टेरिया जमा होऊन दुर्गंधी येते. म्हणून रोज स्वच्छ मोजे घालणे गरजेचं आहे.

२) वापरलेल्या टी बॅग्सना काही वेळाकरिता फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतर त्या टी बॅग्स बुटांत ठेवा. ह्यामुळे बुटांची दुर्गंधी दूर होते.

३) पेपरमिंट आणि लॅवेंडर तेल शरीराची दुर्गंधी दूर करण्यासोबतच त्यांच्या सुगंधाने तुम्ही फ्रेश फील कराल. ह्याने बुटांची दुर्गंधी देखील दूर होते.

४) निंबू आणि संत्री ह्यांसारख्या आंबट फळांच्या साली बुटांवर घासा आणि बुटांच्या आत ठेवा. ह्यामुळे बुटांतून दुर्गंधी येणार नाही. तसंच अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात निंबूचा रस घाला ह्याने देखील पायाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.

५) बुटांना ओलाव्यापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपले बूट नेहमी कोरडे राहतील ह्याची काळजी घ्या. आणि बूट घालायच्या आधी पाय देखील स्वच्छ आणि कोरडे करून घ्या. ह्यामुळे पाय आणि बूट दोघांतुनही दुर्गंधी येणार नाही.

६) विनेगर हा शरीरातील पीएच लेवल ला संतुलित ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे शरीरातील ज्या भागातून वास येतो तेथे थोडं विनेगर लावा. तुम्ही बुटांमध्ये थोडासा विनेगर शिंपडा त्यामुळे बुटांतून वास येणार नाही.

७) बाथरूम आणि कपड्यांची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नेप्थलिनच्या गोळ्या आपण बुटांची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील वापरू शकतो. ह्यासाठी बुटांत नेप्थलिनच्या गोळ्या टाकून काही वेळासाठी त्यांना उन्हात ठेवा, ह्याने बुटांची दुर्गंधी दूर होईल.

८) दोन दिवसातून एकदातरी पाय गरम पाण्यात टाकून बसा. ह्याने तुम्हाला रिलॅक्स तर वाटेलच त्यासोबतच बॅक्टेरिया देखील दूर होतील. ही क्रिया रोज केली तर तुमच्या पायाला वास येणार नाही.

९) उन्हाळ्यात घाम जास्त येतो त्यामुळे बुटातून वास येतो. अशात बुटांचा वास घालविण्यासाठी त्यात थोडा बेकिंग सोडा घाला आणि बूट घालण्याआधी पायावर देखील थोडा बेकिंग सोडा घाला. ह्यामुळे वास निर्माण करणारे बॅक्टेरिया दूर होतात आणि वास येत नाही.


हेही वाचा

हिवाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून असा करा बचाव

जाणून घ्या हार्ट अॅटॅकची लक्षणं आणि प्राथमिक उपचार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा