Advertisement

जाणून घ्या हार्ट अॅटॅकची लक्षणं आणि प्राथमिक उपचार


जाणून घ्या हार्ट अॅटॅकची लक्षणं आणि प्राथमिक उपचार
SHARES

आजकाल धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. अशा परिस्थितीत आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या बळावल्या आहेत. हार्ट अॅटॅकमुळे प्राण गमावल्यांचा वाढता आकडा ही सध्याच्या घडीला सर्वात मोठी समस्या आहे. लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत कुणालाही हार्ट अॅटॅकचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा आपल्याला हार्ट अॅटॅक येऊन गेलेला कळतच नाही किंवा हार्ट अॅटॅकची लक्षणं काय हे कुणाला माहितच नसतं. आज आम्ही तुम्हाला हार्ट अॅटॅक आला आहे हे कसे ओळखायचे आणि प्राथमिक उपचार काय करायचे याची

माहिती देणार आहोत.


प्राथमिक लक्षणं

१) अशावेळी छातीत सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं उद्भवू शकतं. अनेकदा व्यायामाचे प्रकार केल्यानंतर हे दुखणं उद्भवतं. उदा. चालणं, जिने चढणं, सायकल अशा साध्या व्यायाम प्रकारानंतर दुखणं हे हार्ट अॅटॅकची लक्षणं असू शकतात.

२) काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं. हार्ट अॅटॅकच्या वेळी रक्तप्रवाह बंद होतो. त्यामुळे तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यानं चक्कर यायला लागते. आणि जर यामुळे ती व्यक्ती पडली तर समजावे की तिला हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता आहे.

३) काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणं.

४) चेहरा फिका पडणं, कसंतरी वाटणं, खूप भीती वाटणं. श्वास कोंडल्यासारखं वाटणं.

५) उलटी किंवा मळमळ होण्याला बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो. पण तो हृदयाशी संबंधीत असू शकतो. अॅसिडीटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष करू नका.

६) जर तुमच्या जवळ बसलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत असतील, किंवा तिला श्वास कमी पडतोय असं वाटत असेल तर हे तिला हार्ट अॅटॅक येऊ शकतो याचे लक्षण आहे.

७) छातीवर दाब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणं, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणं ही हार्ट अॅटॅकची काही लक्षणं आहेत.

८) अचानक विनाकारण डोकं घणाचे घाव घातल्यासारखं दुखायला लागलं तर हार्ट अॅटॅकची शक्यता बळावते.


प्राथमिक उपचार

अनेकदा अॅम्ब्युलन्स येईपर्यंत प्राथमिक उपचार केल्यास हार्ट अॅटॅक आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. यासाठी खालील उपाय तुम्ही करू शकता.

१) अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या देणं. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवणं.

२) पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास, सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्टिटेशन) यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे त्यांनी पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास आणि बाहेरून हृदयाला कृत्रिम दाब (कार्डिअॅक मसाज) देणं गरजेचं आहे.

३) सीपीआर म्हणजे रुग्णाच्या तोंडामध्ये लांब श्वास सोडावा.

४) डॉक्टर येईपर्यंत रुग्णाच्या छातीवर कृत्रिम दाब देत रहावा.

५) अशावेळी तात्काळ अॅम्ब्युलन्स मागवावी. डॉक्टर येईपर्यंत तुम्ही वरील उपाय करू शकता.हेही वाचा

हे ९ फायदे वाचून तुम्ही कढीपत्ता टाकणार नाहीत

डायबेटिक आहात? मग या टिप्स नक्की फॉलो करा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा