Advertisement

डायबेटिक आहात? मग या टिप्स नक्की फॉलो करा


डायबेटिक आहात? मग या टिप्स नक्की फॉलो करा
SHARES

डायबेटिक म्हटलं की पथ्यपाणी योग्यरित्या करावं लागतं. रक्तातील साखर कमी करणं हे डायबेटिक असलेल्यांपुढे मोठं आव्हान असतं. खाण्या-पिण्याच्या सवयी योग्य नसतील मग रक्तातील साखरेचे प्रमाण देखील वर-खाली होते. रक्तातील साखर एकदम वाढणं आणि कमी होणं शरीरासाठी अपायकारक आहे. शरीरातील शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर खाण्या-पिण्यासोबतच व्यायामावरही लक्ष दिलं पाहिजे. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीनं तुम्ही शुगरवर नियंत्रण मिळवू शकता.


१) दिवसाची सुरुवात फळं किंवा बदाम खाऊन करा. ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध फळांचा आहारात समावेश असावा. सकाळी चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा फळं खाल्लेली चांगली. सफरचंद खाऊन दिवसाची सुरुवात करावी. यासोबत भिजवलेले बदाम खाणं देखील उत्तम पर्याय आहे.

२) तुम्ही कामात कितीही व्यस्थ का असेना पण जेवणाच्या वेळा पाळणं खूप महत्त्वाचं आहे. विशेष करून डायबेटिकनं ग्रस्त असलेल्यांनी तर जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्यात. दुपारी २१ ते १ दरम्यान जेऊन घ्यावं. योग्य वेळी जेवल्यानं पचनक्रिया सुधारते.

३) दुपारच्या जेवणानंतर अनेकदा भूक लागते. अशावेळी अरबट-चरबट खाण्यापेक्षा शेंगदाणे खाणं फायदेशीर आहे. यामुळे भूकही भागते आणि शरीराला अमायनो असिड, मिनरल्स, व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो.

४) चहामध्ये १ टी स्पून साखर पुरेशी आहे. पण शक्यतो बिना साखरेचा चहा पिण्याची सवय लावलीत तर अधिक फायदेशीर आहे. अनेक जण आर्टिफिशियल शुगर वापरतात. पण आर्टिफिशियल शुगर तुमच्या शरीरासाठी हानिकारक असते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही. त्यामुळे चहात एक छोटा चमचा साखर किंवा बिना साखर चहा पिण्याची सवय करा.

५) ब्रेड, पाव, जंक फुड खाणं बंद करा. याशिवाय कोल्ड्रिंक देखील पिणं बंद करा. कारण या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असतं. जरी एखाद दुसरा दिवस असे पदार्थ खाल्ले तर ते कमी प्रमाणात खावेत.

६) योग्य आहारासोबतच शरीराला व्यायामाची देखील नितांत गरज आहे. त्यामुळे सकाळी ४५ मिनिटं तरी वॉकिंग केली पाहिजे. वॉकिंग करत नसाल तर वेट ट्रेनिंग तर केलंच पाहिजे. शरीरातून निघणारा घाम किंवा शरीराची होणारी हालचाल यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा