तिळगूळ घ्या, गोडगोड बोला...

    मुंबई  -  

    दादर - मकर संक्रांत... सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व. या दिवशी सुहासिनी हळदीकुंकू साजरा करतात. एकमेकींना वाण देत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वरळीच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात तर मकर संक्रात दरवर्षी जल्लोषात साजरी केली जाते. यंदाही त्यात तसूभरही कमी झालेली नाही.

    भूईमुगाच्या शेंगा, रानबोरं, ऊस, गाजर या विविध पदार्थांनी सुवासिनींची ओटी भरली जाते. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला 'आवा लुटणे' असे म्हणतात. या महिलांनी खऱ्या अर्थांने आपआपल्या पारंपारिक पद्धतीने मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला.

    Loading Comments
    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.