Advertisement

नो शेव्ह नोव्हेंबर पाळताय? मग या दाढीच्या स्टाईल्स नक्की ट्राय करा


नो शेव्ह नोव्हेंबर पाळताय? मग या दाढीच्या स्टाईल्स नक्की ट्राय करा
SHARES

मिशी आणि दाढी वाढवणं एकेकाळी गबाळेपणाचे लक्षण मानलं जायचं. पण आता ट्रेंड बदलत आहे. त्यामुळे दाढी आणि मिशा हे रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचं लक्षण मानलं जाऊ लागलं आहे. आता तर नो शेव्ह नोव्हेंबर म्हणून एक मोहीम राबवली जाते. नो शेव्ह नोव्हेंबर हा फक्त एक व्हायरल ट्रेंड नसून ती एक सामाजिक बांधिलकी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


कॅन्सरग्रस्तांना मदत

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी महिनाभर दाढी करायची नाही आणि ते वाचलेले पैसे या रुग्णांसाठी द्यायचे हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. चेहऱ्यावरील दाढीचे केस महिन्याभरासाठी वाढू देऊन प्रतीकात्मकरीत्या कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानभुती व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. पण या निमित्तानं दाढीच्या वेगवेगळ्या फॅशन करायला पुरुषांना एक निमित्त मिळालं. हल्ली तशी दाढी ठेवण्याची स्टाईलच आहे म्हणा. पण त्यातही वेगळेपणा कसा आणता येईल यासाठी आम्ही तुम्हाला दाढीच्या वेगवेगळ्या स्टाईल सांगणार आहोत. तुमच्या चेहऱ्या पट्टीनुसार तुम्ही यापैकी एक तरी लुक ट्राय करू शकता.

1) महाराज शेव्हिंग कट
ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भुरळ असलेल्या तरुणांना प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढी-मिशांसारखा प्रकार भलताच आवडतो. वाढलेल्या दाढीला अनेक जण चक्क चक्क शिवाजी महाराजांच्या दाढीप्रमाणे सेट करतात. तरूण पिढी याला महाराज शेव्हिंग कट म्हणून फॉलो करतात.

2) शॉर्ट स्टबल
दाढी आणि मिशी ट्रीम करून तुम्ही हा लुक मिळवू शकता. शॉर्ट स्टबल सर्वात सोप्पी स्टाईल आहे. यात तुमची दाढी भरगच्च ठेवावी लागत नाही. उलट कमीत कमी ठेवली असेल तरच शॉर्ट स्टबल लुक मिळतो.

3) लाँग स्टबल
६ मिलीमिटरपर्यंत वाढलेली दाढी ही लाँग स्टबल या प्रकारात मोडते. विराट कोहलीची दाढी ही लाँग स्टबल या प्रकारात मोडते.

4) व्हॅन डिक लूक
अँथनी व्हॅन डिक लूक या प्रसिद्ध चित्रकाराच्या लुकवरून ही स्टाईल तयार झाली. या प्रकारात मिशा आणि दाढीचा भाग वेगवेगळा केलेला असतो.

5) एक्सेंडेड गोटी
सिक्रेट सुपरस्टारमधला आमीरचा लुक सर्वांच्याच लक्षात असेल. यालाच एक्सेंडेट गोटी म्हणतात.


दाढी-मिशा ठेवताना..

  • तुमच्या चेहऱ्याला सुसंगत होईल अशी दाढीची रचना करा. त्यासाठी चेहऱ्याचा आकार लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्टाइल करा.
  • दाढी वाढवणे म्हणजे ‘स्टाइल स्टेटमेंट’ असले तरी त्याची व्यवस्थित निगा राखणे आवश्यक आहे.
  • दाढी-मिशा वाढवताना चेहऱ्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या. आठवडय़ातून दोनदा ‘क्लीन्सनर’ने चेहरा आणि दाढीचा भाग धुवा. त्यामुळे दाढीच्या केसांखाली असलेल्या मृतपेशी दूर होतात, केसांची वाढ लवकर होते.
  • चांगल्या मॉश्चरायझरनं नियमित मालिश करा.
  • मानसिक ताण असल्यास दाढीची वाढ लवकर होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ‘रिलॅक्स’ राहण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा

असा हाताळा DSLR कॅमेरा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा