Advertisement

रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!


रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
SHARES

पावसाळा आला की नीट ठेवून दिलेली छत्री बाहेर काढली जाते. गेल्या वर्षी वापरलेली छत्री यावर्षी पुन्हा वापरायची म्हणजे बोअरिंगच असतं, नाही का? त्यात त्यावर नाही कसली डिझाईन ना हवा तसा रंग. साधी प्लेन अशी छत्री. पण आता त्याच छत्रीवर हा देखील पावसाळा काढायचा आहे. नवीन छत्री घेण्यात तुम्हाला पैसे वाया घालवायचे नाहीत. मग डोंट वरी! आम्ही आहोत ना तुम्हाला आयडिया द्यायला.  



दरवर्षी नव्या स्टाइलची छत्री घेतली नाही तरी तुमच्या जुन्या पावसाळ्या छत्रीला थोडा हटके आणि मस्त लूक देता येईलपावसाळ्यात साधी प्लेन रंगाची छत्री घेऊन जाण्यापेक्षा आवडती डिझाइन्स असलेली छत्री तुम्हाला कूल लूक देईल. घरच्या घरी तुम्ही तुमच्या छत्रीला मस्तपैकी डिझाइन करण्याचा प्रयत्न करू शकता. आम्ही सांगितलेल्या टिप्स चे अनुकरण करा म्हणजे तुम्हाला हवी तशी रंगीबेरंगी छत्री तयार...



) घरच्या घरी छत्रीवर हवे ते डिझाईन रंगवणे मुळीच अवघड नाही.सर्वात पहिलं छत्री एकाच रंगामधली आणि प्लेन निवडावी. छत्री गडद असल्यास थोडे विचारपूर्वक डिझाईन निवडावे लागतेफिकट रंगाच्या छत्रीवर बहुतेक सर्व रंग उठून दिसतातत्यामुळे डिझाइनच्या हिशोबानं विचार केला असता छत्रीचा रंग फिकट असावा

) छत्रीच्या कापडावर रंगवण्यासाठी अॅक्रेलिक पेन्ट्सचे रंग वापरावेतऊन-पाऊस झेलण्याची क्षमता ही अॅक्रेलिक रंगांमध्ये असते. यासोबत पेन्सिल, वॉटरप्रुफ मार्कर, लहान मोठ्या आकारातील ब्रश आणि पांढरी टेप, इस्त्री असे साहित्य लागेल

) तुम्ही छत्रीवर डिझाईन करू शकता किंवा अक्षरांमध्ये लिहायचं असेल तर तेही करू शकता. तुम्हाला डिझाइन किंवा काय लिहायचं हे ठरवावं.  

) सुरुवातीला पेन्सिलच्या मदतीनं छत्रीवर डिझाईन रेखाटून घ्यावे.



) डिझाईन पूर्ण झाल्यावर वॉटरप्रुफ मार्करनं डिझाईन गडद करावी.

) त्यानंतर डिझाईन अॅक्रेलिक रंगानं रंगवावं

) व्यवस्थित सुकल्यानंतर छत्रीच्या कापडावर ते पक्के बसावे यासाठी त्यावर हलकी इस्त्री फिरवावी.

) इस्त्री करताना हे लक्षात ठेवावं की, छत्रीचं कापड हे नाजूक असतं. त्यानुसार इस्त्रीचे तापमान ठेवावे



हेही वाचा

घरातील आधुनिक बाग!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा