Advertisement

एटीएममध्ये अडकलेले पैसे 'असे' मिळवा


एटीएममध्ये अडकलेले पैसे 'असे' मिळवा
SHARES
Advertisement

एटीएमचा वापर आपण सर्वच करतो. यामुळे प्रत्येकाचं आयुष्य सुखकर झालं आहे यात काही शंका नाही. बँकेच्या लाईनमध्ये तासनतास उभं राहण्यापेक्षा एटीमधून कधीही पैसे काढता येतात. पण शेवटी एटीएमसुद्धा एक मशीन आहे ज्यात कधीही बिघाड होऊ शकतो. अनेकदा होतं असं की पैसे काढायची पूर्ण प्रोसेस झाल्यावर पैसे बाहेर यायच्या वेळीच नेमकी मशीन बंद पडते आणि पैसे अडकतात.

अशावेळी आपण टेन्शनमध्ये येतो. प्रोसेस झाल्यामुळे पैसे अकाऊंटमधून डेबिट होतात. पण हातात नाही येत. अशा वेळी आपण साहजिकच घाबरतो. अडकलेल पैसे काढायचे कसे? अशावेळी काय करायचं? हे आपल्याला कळत नाही. पण आम्ही दिलेल्या टिप्समुळे तुम्ही या समस्येवर देखील मात करू शकता.

1) पैसे अडकले असतील तर सर्वात प्रथम बँकेशी संपर्क करा. तुमच्या बँकेच्या कुठल्याही जवळच्या शाखेत जाणं आवश्यक आहे. बँक बंद असल्यास बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून त्यांना या संदर्भात माहिती द्यावी.

2) ही समस्या सोडवण्यासाठी बँकेला एक आठवड्याचा वेळ मिळतो. जर एका आठवड्यात पैसे परत न मिळाल्यास बँकेला रोज १०० रुपयाचा दंड द्यावा लागू शकतो. याशिवाय तुम्ही बँकिंग लोकपालमध्ये याची तक्रार करू शकता.

3) एटीएममध्ये पैसे अडकले असल्यास ट्रॅन्झॅक्शन स्लीप नेहमी सांभाळून ठेवा. बँकेत तक्रार करताना त्या स्लीपची फोटोकॉपी सादर करता येईल. कारण त्यामध्ये एटीएमची आयडी आणि लोकेशन हे सर्व दिलेलं असतं.

4) एटीएममध्ये ट्रॅन्झॅक्शन फेल झाले असेल तर अशा परिस्थितीत २४ तास वाट बघा. कारण २४ तासात बँक आपली चूक मान्य करत ग्राहकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करते.


5) अशा परिस्थितीत एटीएममधील सीसीटीव्ही देखील पुरावा ठरू शकतो. कारण त्यातून तुम्ही पैसे काढले याचं फुटेज मिळू शकतं.

आता कधी पैसे अडकल्यास घाबरून न जाता या टिप्स फॉलो करा. म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.हेही वाचा -

५० मिनिटात ५० नादनिर्मिती करणारी 'ताल राणी' 

संबंधित विषय
Advertisement