'व्हेलेंटाईन डे'ला साजरा केला 'रोटी डे'

 Parel
'व्हेलेंटाईन डे'ला साजरा केला 'रोटी डे'

परळ - साईबाबांनी दिलेल्या शिकवणीनुसार मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानत गेल्या एक वर्षांपासून सोशल मीडियावर 'जीवन फक्त साई' या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवून गरजूंना मदत केली जाते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून या ग्रुपच्यावतीने टाटा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून 'व्हेलेंटाईन डे दिनानिमित्त 'रोटी डे' साजरा करण्यात आला.

14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस मानत या ग्रुपच्या वतीने परळ पूर्व येथील टाटा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून 'व्हेलेंटाईन डे दिनानिमित्त रोटी डे' साजरा करण्यात आल्याची माहिती ग्रुप ऍडमिन सचिन पिलाणे यांनी दिली.

Loading Comments