Advertisement

फवारणी न केलेल्या भाज्या खायच्यात? मग मातीविना टेरेसवर फुलवा शेत मळा

नवी मुंबईत राहणारे विजय येलमुल्ले यांनी मातीविना शेती (सॉइललेस फार्मिंग)चा प्रयोग करायचा विचार केला. फक्त विचार केला नाही तर तो यशस्वीरित्या पार पाडला.

फवारणी न केलेल्या भाज्या खायच्यात? मग मातीविना टेरेसवर फुलवा शेत मळा
SHARES

शेती आली की माती ही आलीच. मात्र कल्पना शक्तीच्या जोरावर मातीविना शेती देखील करता येऊ शकते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना... पण नवी मुंबईत राहणारे विजय येलमुल्ले यांनी मातीविना शेती (सॉइललेस फार्मिंग)चा प्रयोग करायचा विचार केला. फक्त विचार केला नाही तर तो यशस्वीरित्या पार पाडला.

 

टेरेसवर फुलला मळा

सिंगापूरमधील नोकरी सोडून विजय हे भारतात स्थायिक झाले. भारतात स्थायिक होताना त्यांनी फक्त एकच निश्चय केला होता तो म्हणजे भारतात मातीविना शेती करण्याचा. आज त्यांनी त्यांच्या टेरेसवर एकच सुंदरशी बाग फुलवली आहे. औषधी तुळस,  अळू, ओवा, कढीपत्ता, मेथी, पालक अशा भाज्या आणि फुलझाडांचा मळा त्यांनी टेरेसवर फुलवला आहे.



हायड्रोपोनिक शेती

शेतातील पिके जमिनीवर उभ्या किंवा रांगत्या स्थितीत वाढताना दिसतात. त्यांची मुळे मात्र दिसत नाहीत, कारण ती मातीत रुतलेली असतात. माती पिकांच्या मुळांना आधार देते. त्याचबरोबर वनस्पतींना आणि त्यांच्या मुळांना वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण आणि आवश्यक अन्नद्रव्ये पुरविते. पण हे घटक इतर कुठून मिळाले तर वनस्पती मातीशिवायही वाढू शकते. या तंत्रज्ञानास  ‘हायड्रोपोनिक्स’ म्हणतात. हायड्रोपोनिक्स हा शब्दप्रयोग ग्रीक भाषेतील आहे. त्याचा अर्थ ‘पाण्याला काम करू द्या’ असा होतो.


कशी होते मातीविना शेती?

मातीशिवाय शेतीचे तंत्र प्रामुख्यानं हरितगृहात वापरलं जातं. या तंत्रपद्धतीमुळे जिथं जमीन नाही तिथं देखील शेती करता येते. नारळांच्या काथ्यापासून दोरी आणि तत्सम उद्योग बनविण्याच्या उद्योगातील कोकोपीट हा एक टाकाऊ घटक. या कोकोपीटच्या माध्यमात मुळांची चांगली वाढ होते. या पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा ठिबक सिंचनानं केला जातो. त्यास फर्टगेशिंन म्हणतात. यासाठी पाण्यात विद्राव्य रासायनिक क्षार वापरले जातात. हरितगृहातील आद्रतेचे आणि प्रकाशाचे नियंत्रण केले जाते. प्रामुख्यानं फुलझाडं, विलायती भाज्या, कुंडय़ांतील शोभेची झाडं इत्यादींची लागवड करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. बाजारपेठेच्या गरजेप्रमाणे अशी मातीविना शेती केली तर ती फायदेशीर होऊ शकते.


कमी जागेतही फुलवा मळा

शहरात गच्ची, बाल्कनीचा वापर करूनही अशी शेती करता येते. अशा पद्धतीनं आपणास रोज लागणाऱ्या फळे आणि पालेभाज्या जसे, दुधी, दोडका, कारली, पालक, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, वांगी इत्यादींची लागवड सहज होऊ शकते. ही उत्पादने रोगमुक्त आणि विषारी औषधांचा वापर न करता घेतलेली असतात. 


तुम्हाला देखील घरच्या घरी भाज्या उगवायच्या असतील तर तुम्ही विजय यांना भेटू शकता. ते स्वत: याचं प्रशिक्षण देतात. यासाठी ते पैसे देखील आकारतात. पण तुम्हाला कशा प्रकारे घरच्या घरी भाज्या उगवायच्या, याचं प्रॅक्टिकल नॉलेज देतात.



हेही वाचा -

हातानं नाही तर पायानं चित्र साकारणारे चित्रकार



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा