'विस्टा' फेस्टीव्हलमध्ये विद्यार्थ्यांची धम्माल

  मुंबई  -  

  कांदिवली - येथील ठाकूर महाविद्यालयाचा वार्षिक अांतर महाविद्यालयीन फेस्टीव्हल म्हणजेच 'विस्टा' शुक्रवारी आणि शनिवारी चांगलाच रंगला. मास्टर्स ऑफ कम्प्युटर अॅपलिकेशन विभागातर्फे विस्टा फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. यंदाचे ‘विस्टा’चे हे १२ वे वर्ष होते. या फेस्टीव्हलमध्ये नृत्य, संगीत, फॅशन शो आदी पारंपारिक, सांस्कृतिक स्पर्धांचा सामावेश होता. नृत्य स्पर्धेचे परिक्षण स्टार प्लस चॅनलवरील डान्स प्लस सिझनचा जिंदा रोबोट म्हणून ओळखला जाणारा अमरदिप सिंह नटने केले.

  यंदाचा विस्टा खूप खास होता कारण खुद्द जॉन इब्राहिमने फेस्टीव्हलला उपस्थिती लावली होती. "विस्टा फेस्टीव्हल मुलांमध्ये एकी निर्माण करतो. फॅशन शो, संगीत स्पर्धा, नृत्य स्पर्धा अशा पारंपारिक स्पर्धा पार पडतात. या निमित्ताने मुलांमधील सुप्त गुण पाहायला मिळतात," असे सुदर्शन शिरसाट यानी सांगितले. विस्टा रॉक असे म्हणत ठाकूर महाविद्यालयाच्या डिरेक्टर विनिता गायकवाड आणि मास्टर्स ऑफ कम्प्युटर डिपार्टमेंटच्या हेड अप्रजिता सिंह यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी ‘विस्टा’मध्ये खूप धमाल केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.