इथे संभाषण कौशल्य शिका

 Kandivali
इथे संभाषण कौशल्य शिका

नरदासनगर - भांडुप पश्चिमेकडील ‘आवाज संगीत’ विद्यालयाच्या वतीने ड्रिम्स मॉलमध्ये ६ नोव्हेंबर पासून आवाज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलय. नोकरदार मंडळींपासून ते उद्योजक, कलाकार, शिक्षक, वक्ते, नेते, गृहीणींना संभाषण कौशल्याचा कसा वापर करावा याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर रविवारी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत भरणाऱ्या या कार्यशाळेत १२ सत्रांमध्ये गायक निर्माता निर्देशक किरण खोत यांच्यासह जेष्ठ निवेदक राजेश तांबडे हे आवाजाची काळजी कशी घ्यावी याबाबत धडे देणार आहेत.

Loading Comments