Advertisement

मुंबईजवळील या '५' धबधब्यांवर लुटा मनमुराद आनंद

घाटमाथ्यातून खळखळून वाहणाऱ्या या धबधब्यांवर पर्यटकांची पावले आपसूकच वळत असून ओल्याचिंब वातावरणाचा ते आनंद घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला मुंबई जवळील धबधब्यांची माहिती देणार आहोत.

मुंबईजवळील या '५' धबधब्यांवर लुटा मनमुराद आनंद
SHARES

गेले काही दिवस महाराष्ट्राला भिजवणाऱ्या जलधारांनी नद्या, ओहोळ आणि धबधबे पुन्हा जिवंत झाले आहेत. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते. घाटमाथ्यातून खळखळून वाहणाऱ्या या धबधब्यांवर पर्यटकांची पावले आपसूकच वळत असून ओल्याचिंब वातावरणाचा ते आनंद घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला मुंबई जवळील धबधब्यांची माहिती देणार आहोत. जेणेकरून येत्या विकेंडला तुम्ही यातल्या एखाद्या धबधब्यांना भेट देऊ शकाल.


१) चिंचोटी धबधबा, वसई

वसई रोड स्थानकापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोटी गावाजवळचा चिंचोटी धबधबा हा पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. चिंचोळी गावातूनच ओढय़ाच्या कडेकडेने जाणारी पायवाटेनं तास-दीड तासात पायी धबधब्याशी पोहचू शकता. धबधब्याच्या पोटाशी एक छोटा डोह आहे. तसंच थोडे वर गेल्यास इथून तुंगारेश्वर डोंगराचा छोटासा ट्रेक करता येतो. शिवाय जळच पेल्हारचे धरण आहे.

चिंचोटी धबधबा परिसरात शेवाळे जमून घसरण होते. त्यामुळे तिथं वावरताना योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. तसेच अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा जोर वाढून प्रवाह धोकादायक होतो. अशा वेळी डोहात उतरण्याचा मोह टाळलेलाच बरा. धबधब्याच्या वरून जाणारी एक पायवाट जंगल तुडवीत तुंगारेश्वरकडे घेऊन जाते. ट्रेकिंगचा अनुभव असलेल्यांनी हा छोटासा ट्रेक आजमवायला काहीच हरकत नाही.

कसे जायचे?

ट्रेननं जायचं असेल तर पश्चिम रेल्वेवरील नायगाव स्टेशनला उतरून रिक्षानं इथपर्यंत जावं लागतं. मुख्य धबधब्याजवळ पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी छोटे-मोठे धबधबे पाहायला मिळतात.

) भगीरथ धबधबा, अंबरनाथ

वांगणी स्थानकापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर बेडीसगाव आहे. या गावापासून काही अंतरावरच भगीरथ धबधबा आहे. मस्त भातखाचर पाहत, पाऊस अंगावर झेलत या धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा आनंद काही औरच आहे. या धबधब्याकडे जाणारा मार्ग डोंगरावरून जातो. त्यामुळे पर्यटकांना ट्रेकिंग आणि धबधब्याखाली भिजणं असा दुहेरी आनंद मिळतो.

दोन डोंगर तुडवत धबधब्यापर्यंत यावं लागतं. पहिल्यांदा डोंगराची वाट चढल्यानंतर दुसऱ्या बाजूनं डोंगर उतरावा लागतो. त्यानंतर जंगलातील या निसर्गसौंदर्याने लपेटलेल्या धबधब्यापर्यंत आपण पोहोचतो. जिथं धबधबा पडतो या ठिकाणी जास्त खोली नसल्यानं पर्यटक धबधब्याचा मनमुराद आनंद लुटू शकतात.

कसं जायचं?

मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकावर उतरावं. वांगणीपासून काही किलोमीटर अंतरावर बेडीसगाव आहे. तिथं रिक्षानं जाता येतं. बेडीसगावापासून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे. वांगणीपासून चालत धबधब्यापर्यंत जाण्यात एक वेगळीच मजा आहे.

) वासिंदचा धबधबा 

मुंबई-कसारा मार्गावर असलेल्या वासिंदचा धबधबा बारमाही वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. रायकर पाडा या गावाजवळून भातसा नदी वाहते. या नदीवर बंधारा बांधण्यात आलेला आहे. इंग्रजी झेड आकाराच्या या बंधाऱ्यामुळे इथे छोटासा धबधबा तयार झाला आहे. त्यात डुंबण्याची मजा घ्यायला पर्यटक हमखास येतात. अगदी उन्हाळ्यातही भातसा नदीचे पाणी आटत नसल्याने या मिनी धबधब्याची धारा वाहत असते.


कसं जायचं?

वासिंद रेल्वे स्टेशनपासून दहा मिनिटांच्या अंतरावर रायकर पाडा हे छोटे गाव आहे. या गावातूनच धबधब्याला जाण्याचा मार्ग आहे.


४) मोहिली धबधब

मोहिली धबधबा हा कर्जत पासून ६ ते ७ किलोमीटर दूर आहे. मोहालीत प्रवेश करताना उल्हास नदी ओलांडून समोरच्या डोंगरात हा धबधबा आहे. डोंगर माथ्यावरुन मुंबई-पुणे रेल्वेचा बोगदा इथून दिसतो. कर्जतपासून जवळ असा हा धबधबा आहे.


याहून पुढे ७ किलोमीटर्स दूर गेल्यास कोंडाणाा परिसरात अनेक धबधबे आहेत. इथंही गावकऱ्यांना सांगितल्यास जेवण मिळू शकतं. कोंडाणा परिसरात तिन्ही बाजूंनी डोंगररांगा आणि त्यावरुन जमिनीच्या ओढीनं येणारे धबधबे विलक्षण दिसतात. जरुर अनुभवण्यासारखा हा परिसर आहे.


कसं जायचं?

मोहिलीत पोहोचण्यासाठी कर्जत रेल्वेस्टेशनवर उतरायचं. स्टेशनहून श्रीराम पुलावरुन ऑटोरिक्षाने मोहिलीकडे जाता येतं. कर्जतपासून जवळ असा हा धबधबा आहे.

) अशोका धबधबा

मुंबईपासून २०० किलोमीटरवर हा धबधबा आहे. कसारा घाटातील विहिगाव इथला अशोका धबधबा वन डे डेस्टिनेशन म्हणून अगदी योग्य आहे. पूर्वी या धबधब्याला विहिगावचा धबधबा म्हणून ओळखले जायचे. मात्र शाहरुख खान आणि करिना कपूरच्या अशोका चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग या ठिकाणी झाले होते. तेव्हापासून हा धबधबा अशोका या नावानं ओळखला जाऊ लागला.


जेवणासाठी इथं हॉटेल्सची सोय नाही. पण विहिगावमधल्या काही आदिवासी कुटुंबात योग्य मोबदल्यात शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची उत्तम सोय होते. या ठिकाणी मुक्कामाची सोय होणं तसं कठिण आहे. पण मुंबईहून एका दिवसात तुम्ही इथं येऊ शकता.

कसं जायचं?

मुंबईकडून नाशिकला येताना इगतपुरीच्या जरा अलीकडे कसारा घाटातील डाव्या बाजूच्या रस्त्यानं जव्हार फाटा आहे. तिथून सात किमी अंतरावर विहिगाव आणि अशोका धबधबा आहे.


( नोट : आम्ही दिलेल्या धबधब्यावर जाताना काळजी घ्यावी. आम्ही माहिती दिली असली तरी तुम्ही स्वl: सर्व चौकशी करूनच या ठिकाणी भेट द्या. पाण्याची पातळी अधिक असल्यास पाण्यात उतरू नये. कुणाला काही झाल्यास आमची जबाबदारी नाही. ) 



हेही वाचा

पावसाळ्यात फिरायला जायचंय? मग या ५ ठिकाणी अनुभवा मजा, मस्ती आणि थ्रिल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा