Advertisement

Maharashtra bandh live updates : महाराष्ट्र बंद

SHARE

लखीमपूर खेरी इथल्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या अपघाताच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारनं ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

LIVE UPDATES

09:04 AM, Oct 11 IST
पीएमपीएमएल बस सेवा किमान दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार
09:03 AM, Oct 11 IST
ठाणे परिवहन सेवा (टीएमटी) बंद राहणार; महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर निर्णय
09:02 AM, Oct 11 IST
दादर परिसरात टॅक्सी सेवा सुरू, बस बंद असल्यानं टॅक्सीसाठी नागरिकांची गर्दी, आकारले जातेय अधिक भाडे


09:01 AM, Oct 11 IST
उर्मिला मातोंडकरचा बंदला पाठिंबा
08:56 AM, Oct 11 IST
महाराष्ट्र बंदला भाजप आणि मनसेचा विरोध
08:56 AM, Oct 11 IST
राज्यात बाजारपेठ बंद
08:56 AM, Oct 11 IST
शिवसेनेच्या सुचनेनंतर दादरमधील दुकान बंद
08:54 AM, Oct 11 IST
दादर ते केईएम आणि टाटा हॉस्पिटल शेअरटेक्सीचे दर वाढले

१० रुपयाएवजी १५ ते २० रुपये भाडं आकारलं जातंय 

08:52 AM, Oct 11 IST
महाराष्ट्र बंदचा परिणाम , ओशिवारा बस डेपोत पोलिसांचा कडक बंदोबस्त, बेस्ट बसचे चालक-वाहक डेपोबाहेर उभे


08:50 AM, Oct 11 IST
बेस्टकडून पोलिस सुरक्षेची मागणी

पोलिसांचं संरक्षण मिळाल्यावर नियमित बसेस चालवल्या जातील : मनोज व्हराडे

08:46 AM, Oct 11 IST
लासलगाव बाजार समितीतील कांदा-धान्य लिलाव बंद

२५-३०कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

08:44 AM, Oct 11 IST
मालाडच्या मालवणी परिसरात आणखी एका बसचे नुकसान

तोडफोड केलेल्या बसची संख्या ९ वर

Advertisement
08:34 AM, Oct 11 IST
शहर आणि उपनगरांमध्ये बस सेवा बंद
08:20 AM, Oct 11 IST
महाराष्ट्र बंदचा मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये परिणाम नाही

नेहमीप्रमाणे दादरच्या भाजी मार्केटमध्ये आजही गर्दी आहे.


02:40 AM, Oct 11 IST
मुंबई डबेवाल्यांचा Maharashtra Bandh ला पाठिंबा
11:57 PM, Oct 10 IST
महाराष्ट्र बंद! बेस्ट बसचं काय? जाणून घ्या...पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
11:48 PM, Oct 10 IST
शिवसेना महाराष्ट्र बंदमध्ये ताकदीनं उतरणार

उद्या अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळणार
उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'ला भाजपकडून तीव्र विरोध
राज्यातील काही व्यापारी संघटनांचा बंदला विरोध
एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा उद्या बंद राहणार
भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणामाची शक्यता

11:47 PM, Oct 10 IST
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ

 SRPF च्या 3 तुकड्या, 500 होमगार्ड तैनात 700 स्थानिक शस्त्रधारी असं अतिरिक्त मनुष्यबळ

Advertisement
11:46 PM, Oct 10 IST
व्यापारी असोसिएशनचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा

 मुंबईतील दुकानं दुपारी 4 पर्यंत बंद ठेवणार

09:31 PM, Oct 10 IST
महाराष्ट्र बंदमध्ये ‘ही’ व्यापारी संघटना नाही होणार सहभागीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा