Advertisement

सायबर गुन्ह्यांचा छडा लावणार महेश मांजरेकर!


सायबर गुन्ह्यांचा छडा लावणार महेश मांजरेकर!
SHARES

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते अशी कामगिरी करणाऱ्या महेश मांजरेकर यांनी पदड्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यात पोलिसांच्याही भूमिका आहेत. ‘टेक केअर गुड नाइट’ या मराठी सिनेमात ते पुन्हा पोलिस बनले असून, सायबर गुन्ह्यांचा छडा लावणारा आहे.


स्वत: झाले तयार

सामाजिक संदेश देणाऱ्या ‘टेक केअर गुड नाइट’ या चित्रपटाची पटकथा वाचल्यावर मांजरेकरांनी स्वतः हून त्यातील पोलिसाची भूमिका करणार असल्याचं लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी यांना सांगितलं. सायबर गुन्हेगारीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात सामाजिक व कौटुंबिक पातळीवर कोणते दुष्परिणाम उद्भवतात, हे प्रभावीपणे मांडण्यात आल्यानं अशा या चित्रपटाशी आपणही जोडलं जावं या हेतूने जाणीवपूर्वक मांजरेकरांनी या सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला.


कधी होतोय प्रदर्शित?

‘टेक केअर गुड नाईट’ हा गिरीश जोशी दिग्दर्शित चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. महेश मांजरेकर यांच्यासह या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट असून निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे.



दुसऱ्यांदा एकत्र

महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि गिरीश जयंत जोशी यांनी ‘काकस्पर्श’ हा चित्रपट एकत्र केला होता. तेव्हाच या तिघांमध्ये पुन्हा एखादा चित्रपट एकत्रित करण्याचं ठरलं होतं. जेव्हा जोशी यांनी या दोघांना ‘टेक केअर गुड नाईट’ची कथा ऐकवली तेव्हा या दोघांनीही लगेच होकार दिला. दोघांनाही की कथा आवडली होती. सचिन खेडेकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेबरोबरच महेश मांजरेकर यांची वेगळी भूमिका यात असल्याने या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीत उत्कंठा आहे.



कथा काय?

टेक केअर गुड नाईट’ची कथा दैनंदिन आयुष्यात घडणारी आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाला सरावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात अशाप्रकारच्या सायबरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्या मांडताना हा चित्रपट त्यावरील उपाय आणि बऱ्या-वाईट गोष्टींवर भाष्यही करतो. हा सामाजिक संदर्भ ध्यानात घेऊन मी या चित्रपटात काम करायचं ठरवलं. हा चित्रपट आपल्याला सायबर गुन्ह्यांबद्दल एक वेगळाच दृष्टीकोन देऊन जातो, असं महेश मांजरेकर म्हणतात.



हेही वाचा-

वडील गाॅडफादर असूनही स्वकर्तृत्वाने मुलीने शोधला निर्माता

मूठभर ‘स्वप्न’ आणि ‘ट्रकभर’ पसारा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा