Advertisement

आता युद्ध होणार...स्वप्नीलने फुंकलाय ‘रणांगण’चा बिगुल!

आतापर्यंत सोबत असणारी ही जोडी आता एकमेकांविरोधात उभी ठाकल्याचं बघायला मिळतंय. या युध्दामागचं कारणं काय? कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरूद्ध उभं केलं आहे? आणि या रणांगणात कोण जिंकणार? हे आत्ताच सांगणं कठीण आहे.

आता युद्ध होणार...स्वप्नीलने फुंकलाय ‘रणांगण’चा बिगुल!
SHARES

सध्या छोटा पडदा गाजवत असलेली सचिन – स्वप्नील ची नंबर वन जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे. नुकताच लाँच झालेल्या 'रणांगण' चित्रपटाच्या टीझरमधून आतापर्यंत सोबत असणारी ही जोडी आता एकमेकांविरोधात उभी ठाकल्याचं
बघायला मिळतंय. या युध्दामागचं कारणं काय? कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरूद्ध उभं केलं आहे? आणि या रणांगणात कोण जिंकणार? हे आत्ताच सांगणं कठीण आहे.

नुकत्याच लाँच झालेल्या टीझरमधून अनेक नवे चेहरे समोर आले आहेत. त्यामुळे सचिन-स्वप्निल यांच्याबरोबरच अनेक स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकरांबरोबरच सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, आनंद इंगळे आणि इतर कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं आहे. स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, आनंदी जोशी आणि वैशाली माडे यांनी चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. 'रणांगण' हा चित्रपट येत्या ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.




हेही वाचा

'ख्वाडा'नंतर भाऊराव कऱ्हाडांचा 'बबन'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा